'कर्नाटकामध्ये काँग्रेसची सत्ता येणार',आमदार प्रणिती शिंदे यांचा दावा

कर्नाटक:  कर्नाटकातील दावणगिरी मतदारसंघाची जबाबदारी माझ्यावर आहे. या मतदारसंघात मी निरीक्षक म्हणून काम पाहिले आहे. माझ्या निरीक्षणानुसार, सध्याचे वातावरण हे काँग्रेसला पुरक असून कर्नाटकात काँग्रेसची सत्ता येईल, असा दावा आमदार प्रणिती शिंदे यांनी केला.श्रमिक पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेनंतर राजकीय विषयावर बोलताना त्या बोलत होत्या. सध्या कर्नाटकात निवडणुका सुरू आहे. या कर्नाटक निवडणूक प्रचारात सोलापूर जिल्ह्यातील आमदारांचा सहभाग आहे. भाजपचे दोन्ही देशमुख बेळगाव आणि विजापूर मतदारसंघाची जबाबदारी सांभळत आहेत. तर ‘आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडे असलेली जबाबदारी आणि कर्नाटकातील जनतेचा कौल’ या विषयावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी हे उत्तर दिले.



यावेळी आमदार शिंदे पुढे म्हणाल्या की, कर्नाटकामध्ये सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. माझ्यावर दावणगिरी मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली होती. मी या मतदारसंघात निरीक्षक म्हणून काम पहिले आहे. कर्नाटकातील राजकीय वातावरण पाहता काँग्रेस पूरक असल्याचे दिसून येते. परंतु, तेथील काँग्रेस नेत्यांनी मात्र निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सतर्क राहण्याची गरज आहे. काँग्रेसचे स्थानिक नेत्यांनी आपली सत्ताच येईल, या अविर्भावात न राहता आणि अतिआत्मविश्वास न बाळगता काम करणे गरजेचे आहे.कारण विरोधी पक्ष भाजप हा वेगवेगळ्या मार्गाने काँग्रेसला अडचणीत आणण्याचे काम करीत आहे. भाजप नेहमीप्रमाणे ईडी व इतर चौकशी ही शस्त्र वापरून विरोधकांना वेठीस धरत आहेत.

मी शहर ‘मध्य’चीच आमदार

भविष्यातील खासदार म्हणून चर्चा आहे, या विचारलेल्या प्रश्नावर म्हणाल्या शिंदे-फडणवीस सरकार महापालिकांच्या निवडणुका घ्यायला घाबरत आहे. विधानसभा आणि लोकसभा या तर फार लांबच्या गोष्टी आहेत. परंतु, मी सध्या सोलापूर शहर मध्यचीच आमदार आहे, असे सांगत त्यांनी खासदारकीच्या निवडणुकीच्या विषयाला त्यांनी बगल दिली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने