न्यायालयाचा निर्णय चुकीचा; राहुल गांधींची याचिका फेटाळल्यानंतर सिंघवींची प्रतिक्रिया

नवी दिल्ली : मोदी आडनाव प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना गुजरातच्या सत्र न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. काँग्रेस नेते आणि ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी कोर्टाने दिलेल्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली असून सत्र न्यायालयाचा निर्णय चुकीचा असल्याचे म्हटले आहे.तसेच ते म्हणाले की आम्ही आमच्या अधिकार क्षेत्राचा वापर करू.तसेच राहुल गांधींच्या विधानाला तोडून मोडून नवा आयाम देऊन चुकीच्या पद्धतीने प्रेझेंट करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं.निर्णयात दिलेली कारणे संशयास्पद आहेत. ओबीसी समाजातील लोकांनी समजून घेतलं. पण मोदीजी आणि भाजप यावर राजकारण करत आहे. राहुल गांधी लोकसभेत बोलतात. ते कधीही चुकीचं बोलत नाहीत. त्यांना बोलण्यापासून रोखू शकत नाहीत. आम्ही कायदेशीर पावले उचलत राहू असंही सिंघवी यांनी नमूद केलं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने