कर्नाटकात काँग्रेस १३० जागा जिंकेल ; एम.वीरप्पा मोईली

नवी दिल्ली : कर्नाटकात बदलाचे वारे वाहत असल्याचा दावा करत राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस किमान १३० जागा जिंकेल, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एम.वीरप्पा मोईली यांनी आज केला. भाजपसाठी दक्षिणेचे प्रवेशद्वार असलेल्या कर्नाटकचे दरवाजे पूर्णपणे बंद होतील, असेही ते ‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.केंद्रात सरकार बनविण्यात कर्नाटकने नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावली असून या राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीतील विजयामुळे २०२४ मध्ये केंद्रात काँग्रेस नेतृत्वाखालील सरकार बनविण्याचा मार्ग मोकळा होईल, असा विश्वासही मोईली यांनी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले, की कर्नाटकच्या २२४ जागांच्या विधानसभेत काँग्रेसला किमान १३० जागा मिळतील तर भाजप ६० पेक्षा अधिक जागा जिंकणार नाही.जनता दल(धर्मनिरपेक्ष) ने भाजपशी संगनमत केले असून मतदार पक्षाचे अध्यक्ष व माजी पंतप्रधान एच.डी.देवेगौडा यांचे संधीसाधू राजकारण नाकारतील. कर्नाटकात बदलाचे वारे वाहत असून ते काँग्रेसच्या बाजूने आहेत.मोईली म्हणाले...

भाजपच्या राजवटीत एकही उद्योग तसेच नोकऱ्याही नाहीत. शिक्षकांच्या अनेक जागा रिक्तच

कर्नाटकातील प्रत्येक रस्त्यावर भ्रष्टाचाराची चर्चा

कृष्णा नदीच्या पाणीवाटपाबाबत लवादाच्या निर्णयानंतरही भाजपकडून अधिसूचना नाही. कर्नाटकने हक्काचे पाणी गमाविले

कर्नाटकात ‘मोदी फॅक्टर’ चालणार नाही

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने