लाईक का केलं? पृथ्वीराज चव्हाण म्हणतात 'इतक्या वर्षात..'

मुंबई: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी, भाजप नेते मोहित कंबोज यांनी पोस्ट केलेल्या फडणवीसांच्या व्हीडिओला लाईक केलं. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली. या बातमीवर पृथ्वीराज चव्हाणांनी स्पष्टीकरण दिलं आहे.पृथ्वीराज चव्हाण यावर बोलताना म्हणाले कि, 'नक्की काय झालंय ते मी तपासून बघतोय. इतक्या वर्षात मी कधीही असं काही केलं नाही, मला जर असं करायचं असतं तर मी खुल्या मंचावरुन केलं असतं, माझी भूमिका मांडण्यासाठी मी एखाद्या ट्विटला लाईक का करेन', अशी भूमिका पृथ्वीराज चव्हाणांनी मांडली आहे.



ट्विटरच्या कव्हर फोटोवरून काँग्रेसचं चिन्ह काढलं का, असाही प्रश्न पृथ्वीराज चव्हाणांना विचारण्यात येत आहे. त्यावरही त्यांनी उत्तर दिलं आहे. माझ्या कव्हर फोटोमध्ये काँग्रेसचं चिन्ह कधीच नव्हतं आणि कुणी असा दावा करत असेल तर ते कधी होतं हे त्यांनी दाखवावं, असंही चव्हाण पुढे म्हणाले आहेत.महाराष्ट्रात भाजपकडून ऑपरेशन लोटस सुरू असल्यांचा दावा, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर केलेली टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी लाईक केली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा खळबळ माजली आहे.

भाजप नेते मोहित कंबोज यांनी काही दिवसांपूर्वी म्हणजेच ५ एप्रिलला देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडीओ आपल्या ट्विटरवर शेअर केला होता. त्यामध्ये फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता.उद्धव ठाकरे , कोण होतास तू , काय झालास तू अरे असा कसा वाया गेलास तू …अशी टीका फडणवीसांनी ठाकरेंवर केली होती.दरम्यान, सत्ताधारांच्या विरोधात असणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेता चव्हाण यांनी कंबोज यांच्या या ट्विटला लाईक केले आहे.

कोण होतास तू काय झालास तू…फडणवीस

देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरात जोरदार हल्लाबोल केला. “तुम्ही मुख्यमंत्री असताना काँग्रेसच्या मुखपत्राने लेख छापला. म्हणाले, स्वातंत्र्यवीर नाही माफीवीर, सावकरांनी बलात्कार केला होता, इतकं भयानक लिहिलं होतं.पण यांना खुर्चीची चिंता होती. साधा निषेध सुद्धा केला नाही. ते ज्यावेळेस महाराष्ट्रात आले त्यावेळेस त्यांच्या गळ्यात गळे घालून त्यांच्यासोबत पायी चालत होते. म्हणून म्हटलं कोण होतास तू काय झालास तू…”, अशी टीका करत देवेंद्र फडणवीस यांनी सवाल उपस्थित केला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने