'Pushpa 2 ' च्या पोस्टरवर स्त्री पेहरावात का दिसतोय अल्लू अर्जुन? समोर आली एक नाही..तीन-तीन कारणं..

मुंबई: बॉक्स ऑफिसवर ४०० करोडहून अधिक बिझनेस करणाऱ्या 'पुष्पा द राइज' सिनेमानंतर आता चाहते 'पुष्पा द रूल' सिनेमाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. सिनेमाच्या दुसऱ्या भागाचा टीझर व्हिडीओ काही दिवसांपूर्वी रिलीज केला गेला. ज्यासोबत सिनेमातील अल्लू अर्जुनचा फर्स्ट लूक पोस्टर देखील रिलीज केला गेला.पोस्टरमध्ये अल्लू अर्जुन स्त्री पेहरावात दिसत आहे. आता प्रश्न हा उठतो की अल्लू अर्जुनला नेमकं असं का दाखवलं आहे?या प्रश्नाची ३ उत्तरं असू शकतात. कदाचित सिनेमात 'पुष्पा' या भूमिकेला Gangamma Talli Jathara मध्ये भाग घेताना दाखवलं असेल..आता ही अशी पहिल्या शक्यता बोलली जात आहे. ही एक परंपरा आहे. तिरुपतीमध्ये या परंपरेला सेलिब्रेट केलं जातं. त्यावेळी पुरुष देखील स्त्रियांची वेशभुषा करत त्यांच्यासारखे कपडे,दागदागिने परिधान करतात आणि स्त्रियांसारखं तयार होऊन पूजेत सहभागी होतात. पण मग अल्लू अर्जूनच्या हातात त्या पेहरावात बंदूक धरलेली दाखवली आहे,त्याचा अर्थ काय?पुष्पाला असा लूक देण्यामागे दुसरी शक्यता आहे ती म्हणजे कदाचि पुष्पा स्त्रियांसारखे कपडे परिधान करुन पोलिसांपासून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असेल. कारण सिनेनाच्या प्रमोशनची सुरुवातच #Whereispushpa कॅंपेननं केलेली दाखवली आहे.त्यामुळे ही मोठी शक्यता आहे की पोलिसांपासून दूर पळण्यासाठी पुष्पा म्हणजे अल्लू अर्जुनला स्त्री पेहरावात दाखवलं असावं. पुष्पाची चालाख बुद्धी पहिल्या भागात आपल्याला पहायला मिळालीच आहे.

तिसरी शक्यता वर्तवली जात आहे ती म्हणजे पुष्पाला असा लूक देण्यामागे एक कारण असू शकतं ते म्हणजे कदाचित श्रीवल्लीचा खून झाला आहे.एका चाहतीनं तर असं देखील म्हटलं आहे की कदाचित पुष्पाचं जिच्यावर प्रेम आहे त्या श्रीवल्लीचा खून झाला आहे आणि त्याला आता त्याचा बदला घ्यायचा आहे म्हणून तो श्रीवल्लीच्या अंदाजात परत आलेला दाखवला आहे. टीझर व्हिडीओमध्ये लोकांनी पुष्पाच्या एका बोटावर लावलेली नेलपेंट देखील पाहिली जी आधी दाखवली नव्हती.आता ही तीन कारणं म्हणजे लोकांनी लावलेले अंदाज आहेत पण पुष्पाला पोस्टरवर स्त्री पेहरावात का दाखवलं आहे हे सिनेमा रिलीज झाल्यावरच कळेल बहुधा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने