मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये डिहायड्रेशन आणि घामामुळे अनेक समस्या निर्माण होतात. या दिवसांमध्ये खास करून पोटाशी Stomach संबंधीत अनेक समस्या उद्भवतात. अनेकता पोट फूलणं किंवा एसिडीटीचा Acidity त्रास होते. तसचं पचन क्रिया मंदावल्याने पोटदुखीचाही त्रास होतो. अनेकजण साधारण भाषेत याला पोटात गरमी निर्माण झाली असंही म्हणतात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पोटातील ही गर्मी कमी करण्यासाठी अनेकजण वरेवर गार पाणी पिणे किंवा कोल्ड ड्रिंक Cold Drink पिण्याचा पर्याय निवडता. मात्र यामुळे पोटाला फक्त तात्पुरता थंडावा मिळतो. याने पोटातील त्रास कमी होत नाहीत उलट भविष्यात इतर समस्या निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. त्याएवजी तुमच्या स्वयंपाक घरातच Kitchen असलेल्या काही पदार्थांपासून तयार केलेले पेय Drinks प्यायल्याने तुम्हाला नक्कीच आराम मिळू शकतो. स्वयंपाक घरात सहज उपलब्ध असलेल्या पदार्थांच्या मदतीने तयार करण्यात आलेल्या या पेयांमुळे पोटातील त्रास कमी होण्यासोबतच शरीरासाठी इतरही चांगले फायदे होतील.
पुदिना काकडी ड्रिंक- पुदिनाचे अनेक औषधी उपयोग आहेत. पुदिनामध्ये फायटोन्यूट्रिएन्ट्स आणि अँटीऑक्सिडंट उपलब्ध असतात. यामुळे पचनास मदत होते. तसचं यातील मेन्थॉलमुळे पोटातील गॅसचा त्रास कमी होतो. तर काकडीत मुबलक प्रमाणात पाण्याची मात्र असते. काकडी शरीरासाठी थंड असते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये काकडीचे तुकडे आणि पुदिनाची काही पानं मिक्सरमध्ये ब्लेंड करा. यात तुम्ही लिंबू देखील पिळू शकता. हे ड्रिंक प्यायल्याने पोटातील गरमी कमी होण्यास मदत होईल.
आलं पुदिना चहा- आलं आणि पुदिनाच्या चहाचं सेवन करून तुम्ही उन्हाळ्यात पोटाशी संबधित निर्माण होणाऱ्या समस्या दूर करू शकता. यासाठी पुदिन्याची काही पानं आणि आल्याचे काही तुकडे पाण्यात एकत्र उकळावे. त्यानंतर गाळून हा चहा थोडा गार झाला की त्याचं सेवन करावं. यात तुम्ही लिंबू आणि थोडं सैंधव मीठ घालू शकता.
मेथी दाणे- पोटासंबंधी समस्या दूर करण्यासाठी मेथीचे दाणे गुणकारी आहेत. यातील अँटी-इंफ्लामेंट्री गुणधर्मामुळे पोटाचे विकार दूर होतात. रात्री एक चमचा मेथी दाणे भिजत घालावे. सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी प्यावं. तुम्ही मेथीचे दाणे चावूनही खावू शकता.
वेलची- चहापासून ते जेवणातील विविध पदार्थांचा स्वाद वाढवणारी वेलची आपल्या पोटासाठी देखील उपयुक्त आहे. यात कुलिंग इफेक्ट्स असतात. तसचं पचन होण्यास मदत होते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तुम्ही इलायचीची आईस टी पिऊ शकता. यासाठी तुम्हाला केवळ पाण्यामध्ये काही इलायची उकळवायच्या आहेत. त्यानंतर गार करून त्यात काही बर्षाचे तुकडे टाकून तुम्ही ही आईस टी पिऊ शकता.
ओवा, जीरं आणि बडीशेपेचं पाणी- या ड्रिंकमुले आतडी निरोगी राहण्यास मदत होते. हे ड्रिंक बनवण्यासाठी ओवा, जिरं आणि बडीशेप समप्रमाणात घेऊन त्याची पावडर करून घ्यावी. त्यानंचर भांड्यात पाणी गरम करून त्याच एक मोठा चमचा ही पावडर टाकून ३-४ मिनिटं उकळू द्यावं. हे पाणी कोमट झाल्यावर त्याचं सेवन करावं.
भाताची कांजी- तांदळाची कांजी हे एक उत्तम प्रोबायोटिक ड्रिंक आहे. यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. ही कांजी बनवणं अत्यंत सोप आहे. हे ड्रिंक बनवण्यासाठी ३-४ चमचे शिजलेला भात, एक ग्लास पाणी आणि एक मातीचं भांड घ्यावं. त्यानंतर मातीच्या भांड्यामध्ये पाणी टाका आणि यात शिजलेले भाताचे दाणे टाकावे. हे मिश्रण ५-६ तासांसाठी झाकून ठेवावं. त्यानंतर हे पाणी एका ग्लासामध्ये काढावं यात जीरं आणि काळ मीठ चांगलं मिसळून घ्यावं. अशा प्रकारे तयार झालेल्या कांजीचं सेवन तुम्हाला उन्हाळ्यात पोटाला आराम देईल.
खडीसाखर आणि धण्याचं पाणी- उन्हाळ्यात होणाऱ्या पोटाच्या समस्या तसचं उष्माघातामुळे लघवीला त्रास होत असल्यास धणे आणि खडीसारखरेच पाणी आरामदायी ठरतं. यासाठी रात्री एका ग्लासाच एक मोठा चमचा धणे भिजत घालावे. सकाळी हे पाणी गाळून घ्यावं आणि त्यात खडीसाखर बारीक करून टाकावी. हे पाणी प्यायल्याने पोटातील उष्णता कमी होण्यास मदत होते. तुम्ही धणे उकळूनही त्यात खडीसाखर टाकून ते पाणी गार करून पिऊ शकता.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्या किचनमध्ये कायमच असलेल्या या पदार्थांपासून तुम्ही वेगवेगळे ड्रिंक बनवून पोटाशी संबंधीत पोटदूखी आणि पित्तासारख्या समस्या दूर करू शकता. उन्हाळ्यात होणाऱ्या पोटाच्या समस्या तसचं उष्माघातामुळे लघवीला त्रास होत असल्यास धणे आणि खडीसारखरेच पाणी आरामदायी ठरतं.यासाठी रात्री एका ग्लासाच एक मोठा चमचा धणे भिजत घालावे. सकाळी हे पाणी गाळून घ्यावं आणि त्यात खडीसाखर बारीक करून टाकावी. हे पाणी प्यायल्याने पोटातील उष्णता कमी होण्यास मदत होते. तुम्ही धणे उकळूनही त्यात खडीसारखर टाकून ते पाणी गार करून पिऊ शकता. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्या किचनमध्ये कायमच असलेल्या या पदार्थांपासून तुम्ही वेगवेगळे ड्रिंक बनवून पोटाशी संबंधीत पोटदूखी आणि पित्तासारख्या समस्या दूर करू शकता.