अजित पवारांच्या चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादीला मोठा धक्का! बडा नेता भाजपच्या गळाला

मुंबई:  महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भुकंप होणार असल्याच्या बातम्या सतत येत आहेत. तसेच मागील १५ दिवसांपासून राज्याचं राजकारण राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या भोवती फिरत आहे. अजित पवार भाजप प्रवेश करणार अशा चर्चांना उधाण आलं आहे.त्याच बरोबर प्रकाश आंबेडकर यांनी येत्या १५ दिवसांत राज्यात दोन मोठे राजकीय भूकंप होणार असल्याचं विधान केलं. चर्चेत अजूनच भर पडली एकीकडे अजित पवार भाजपमध्ये जाणार अशा चर्चा असताना नाशिकमध्ये भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेसचा करेक्ट कार्यक्रम करण्यात आला आहे.



माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांना जबर धक्का बसला आहे. भुजबळ यांचे निकटवर्तीय मानले जाणारे सुनील मोरे यांनी राष्ट्रवादीला रामराम केला आहे. सुनील मोरे लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.सोबत शेकडो कार्यकर्ते देखील कमळ हाती घेणार आहेत. मोरे हे राष्ट्रवादीसह शहर विकास आघाडीच्या माजी ११ नगरसेवक आणि शेकडो समर्थक कार्यकर्त्यांसह भाजप पक्षप्रवेश करणार आहेत.

सुनील मोरे हे छगन भुजबळ यांचे विश्वासू मानले जात. त्यामुळे राष्ट्रवादीसोबतच भुजबळ यांना देखील मोरे यांचा भाजपप्रवेश हा मोठा धक्का मानला जात आहे. मोरे यांच्या ग्रामीण भागामध्ये दांडगा जनसंपर्क आहे. त्यामुळे भाजपला नाशिकच्या ग्रामीण भागांत चांगला फायदा होण्याची शक्यता आहे.भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मालेगावच्या दौऱ्यावर असताना सुनील मोरे यांची भेट घेतली होती. या भेटी नंतर मोरे यांच्या भाजपप्रवेशाच्या चर्चांना उधाण आलं होतं. अखेर मोरे यांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब झाल्याचं समोर येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने