"आपल्याला अमेरिका, चीनसारखं बनायचं नाही!"

मुंबई:  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की भारत आपल्या धार्मिक कर्तव्यांची सेवा करण्यावर विश्वास ठेवतो. आज वेद संस्कृत ज्ञान गौरव समारोहात ते बोलत होते. आपल्याला अमेरिका, चीनसारखं बनायचं नाही, असं भागवत म्हणाले आहेत.यावेळी मोहन भागवत म्हणाले की, भारत दुसऱ्यांची सेवा करण्यावर विश्वास ठेवतो आणि या परंपरेचं पालन वेदांच्या कालखंडापासून केलं जात आहे. आपला देश एक धर्मी राष्ट्राच्या रुपात विकसित होत आहे आणि आपल्या धार्मिक कर्तव्यांचं पालन करत आहेत. कारण हा एक विकसित राष्ट्राकडे जाण्याचा मार्ग आहे.संघ प्रमुख मोहन भागवत म्हणाले की विकसित राष्ट्र इतर देशांवर आपल्या शक्तीचा प्रयोग करतात, जसं सोविअतला अमेरिकेने नष्ट केलं. मोहन भागवत पुढे असंही म्हणाले की आता चीन अमेरिकेवर प्रभाव टाकत आहे. तर अमेरिका आणि रशिया युक्रेनचा प्याद्यासारखा वापर करत आहेत. भागवत पुढे असही म्हणाले की भारताने प्रत्येक परिस्थितीमध्ये गरजू देशांना मदत करण्याचं समर्थन केलं आहे.मोहन भागवत म्हणाले की, भारत युक्रेनची मदत करू इच्छितो आणि हाच आपला देश आहे. रशिया आणि अमेरिका दोन्ही देशांना भारताला आपली बाजू घ्यायला सांगितलं होतं. पण भारताने उत्तर दिलं की सगळे देश आमचे मित्र आहेत आणि भारताने सगळ्याच आधी युक्रेनला मदत देण्याचं काम केलं. भारताने युद्ध बंदीचं आवाहनही केलं होतं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने