भारत लोकसंख्येत नंबर 1 झाल्यावर चीन चिडला, 'फक्त Quantity नाही तर..'

दिल्ली: वाढत्या लोकसंख्य़ेला भारत खरंतर कोणतेही फार मोठे यश समजत नाही. पण भारत लोकसंख्येच्या बाबत जगात नंबर १ झाल्याची चीड चीन ला आली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाला विचारलं की, भारताने चीनला मागे सोडत सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनला. यावर चीनची काय प्रतिक्रिया आहे?या प्रश्नाच्या उत्तरावर भारताचं नाव न घेता उपहासाने चीन म्हणाला की, फक्त लोकसंख्या वाढवून देशाला फायदा मिळत नाही, तर त्या लोकसंख्येत क्वालिटीपण असायला हवी. चीन म्हणाला की, आता आमच्याकडे ९०० मिलीयन म्हणजेच ९० कोटी लोकांचा वर्क फोर्स आहे, ज्याचा चीनी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी उपयुक्त ठरेल.संयुक्त राष्ट्राच्या लेटेस्ट माहितीनुसार १९ एप्रिलला १४२.८६ कोटी लोकसंख्या करत भारताने आता चीनला मागे सोडत जगातल्या सर्वाधिक लोकसंख्येचा देश झाला आहे. चीन आता १४२.५७ कोटी लोकसंख्येने दुसऱ्या नंबरवर आहे.फक्त क्वांटिटी नाही तर क्वालिटी हवी

याविषयी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाला प्रश्न विचारला गेला त्यावेळा प्रवक्ता वेंग वेनबिन म्हणाले, मी तुम्हाला सांगू इच्छितो की, लोकसंख्येने होणारा फायदा क्वांटिटीवर नाही तर गुणवत्तेवर अवलंबून असतो. लोकसंख्या तर महत्वाची आहे, पण यासोबत टॅलेंटपण असणं आवश्यक आहे.त्यांनी सांगितलं की, चीनची लोकसंख्या १.४ बिलीयनपेक्षा जास्त आहे. काम करू शकणाऱ्या वयाच्या लोकांची संख्या ९०० मिलियनच्या जवळपास आहे. शिवाय वृद्ध होत जाणाऱ्या लोकसंख्येने निर्माण होणाऱ्या समस्या सोडवण्याचाही प्रयत्न करत आहोत.वेंग वेनबिन यांनी सांगितलं की, प्रीमियर ली कियांग यांनी निदर्शनास आणल्याप्रमाणे, आमचा लोकसंख्या डेव्हिडंट संपलेला नाही आणि आमचा प्रतिभा डेव्हिडंट देखील भरभराट आणि विकसित होत आहे.

चीनला लोकसंख्या डेव्हिडंट संपण्याची भीती

जगातल्या सर्वाधिक लोकसंख्येचा देश असणारा चीन आजवर पॉप्युलेशन डेव्हिडंटचा फायदा घेत होता. त्यांना कमी किंमतीवर चांगले आणि क्वालिटी लेबर मिळतात. चीनला कामगार, हायटेक लेबर, डॉक्टर्स, इंजिनीयर यांची कमतरता नव्हती. पण वाढता जीवन दर, वृद्ध होत जाणारी लोकसंख्या वर्षानुवर्षे चाललेल्या एक मूल धोरणामुळे चीनची लोकसंख्या पूर्वी अनेक वर्षे स्थिर होती आणि आता ती कमी होऊ लागली आहे. म्हणूनच चीनला वर्षानुवर्षे मिळत असलेला लोकसंख्या डेव्हिडंट संपण्याची भीती वाटत आहे.

चीन म्हातारा होण्याच्या वाटेवर

लक्षणीय बाब म्हणजे भारताचं सरासरी वय २९ आहे. म्हणजे आपल्या लोकसंख्येचा अर्धा भाग २९ वर्षांचं वय असणारा आहे. यूनायटेड नेशंस पॉप्युलेशन फंड (UNFPA) नुसार भारतात ६८ टक्के लोक १५ ते ६४ या वयोगटातील आहे. अर्थात हा सर्वात कार्यक्षम वयोगट आहे.तेच जर चीनकडे बघितले तर चीन म्हातारा होत आहे. आता चीनचं सरासरी वय ३९ वर्ष आहे. पुढच्या २७ वर्षांत म्हणजे २०५० पर्यंत त्यांच सरासरी वय ५१ होईल. यासोबतच चीनमध्ये वर्कफोर्स संदर्भात समस्या निर्माण होतील.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने