दंडुकेशाहीनं सर्वेक्षण करू नका; अजित पवारांची राज्य सरकारला विनंती

रत्नागिरी: बारसू-सोलगाव रिफायनरीसाठी सर्वेक्षण सुरू केलं जाणार आहे, मात्र या सर्वेक्षणाला स्थानिकांकडून तीव्र विरोध नोंदवला जात आहे. स्थानिकांच्या या आंदोलनाचा आज दुसरा दिवस असून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी ट्वीट करत सरकारला आंदोलकांशी चर्चा करण्याची विनंती केली आहे. तसेच हे सर्वेक्षण स्थगित केलं जावं अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. अजित पवार यांनी ट्वीट करत याबद्दलची मागणी केली आहे. खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्यावेळी उष्माघाताने काही नागरिकांचा मृत्यू झाला होता. याची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी सरकारने घ्यावी असेही अजित पवार म्हणाले आहेत.



"रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस. आंदोलक ठाम असून त्यात महिला आणि मुलांचाही समावेश आहे. राज्यात उष्णतेची प्रचंड लाट आहे. खारघर घटनेत अगोदरच काही लोकांना आपण गमावलं आहे. त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घ्यावी", असे अजित पवार म्हणाले आहेत.सर्वेक्षण स्थगित करावं, मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्यांनी आंदोलकांशी चर्चा करावी आणि मार्ग काढावा. पोलिसी बळाचा वापर करून दंडुकेशाहीनं सर्वेक्षण करू नका, अशी सरकारला विनंती आहे. सर्वेक्षण त्वरित स्थगित करावं , असं ट्वीट अजित पवारांनी केलं आहे.

आंदोलकांवर कारवाई

आजपासून रिफायनरीच्या जागेचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. मात्र त्याआधीच स्थानिकांच्या विरोधाला सामोरं जावं लागत आहे. याआधी रिफायनरी विरोधी संघटनेचे मुंबई अध्यक्ष वैभव कोळवणकर यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. तसेच, त्यांच्यासोबत इतर दोघांनाही अटक करण्यात आली आहे. इतकेच नाही तर याठिकाणी आंदोलन करणाऱ्या २५ महिलांना देखील पोलिसींनी अटक केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने