राजाराम कारखाना निवडणूकीपूर्वी सतेज पाटलांची मोठी घोषणा

कोल्हापूर: ‘गेल्या २८ वर्षांत जिल्ह्यातील अन्य कारखान्यांच्या तुलनेत राजाराम कारखान्याकडून प्रतिटन उसाला २०० रुपये कमी दर मिळाला आहे. यामध्ये सभासदांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकवलेल्या उसाला योग्य दर मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे, शेतकरी सभासदांनी राजाराम कारखान्यामध्ये इतर कारखान्यांच्या बरोबरीने दर मिळवण्यासाठी या निवडणुकीत परिवर्तन आघाडीच्या ‘अंगठी’ या चिन्हाला भक्कम साथ द्यावी’, असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले.राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीच्यावतीने सोन्याची शिरोली येथे झालेल्या प्रचारसभेत ते बोलत होते.आमदार पाटील म्हणाले, ‘ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे अर्थकारण त्यांनी पिकवलेल्या उसाच्या दरावर अवलंबून आहे. मात्र, राजाराम कारखान्याकडून उसाला योग्य दर मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी सभासदांनी केल्या आहेत.आमच्या उसाला रिकव्हरीही चांगली आहे, ऊस वाहतूक, तोडणी खर्चही कमी आहे. असे असतानाही राजाराम कारखान्याने आम्हाला आजपर्यंत २०० रुपये दर कमी दिल्याचे सभासद पोटतिडकीने सांगत आहेत. त्यामुळे शेतकरी, सभासदांच्या हिताला आमचे सर्वोच्च प्राधान्य राहील. उस उत्पादकांना चांगला दर देऊन त्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य देऊ.’

मारूती चौगले म्हणाले, ‘अमल महाडिक यांनी गगनबावड्यातील साखरीमध्ये ११८ गुंठे जमीन २ लाख रुपयेला गहाणवट देऊन चावरेतील बोगस सभासद केले आहेत. डोंगराळ भागातील ही जमीन २ वर्षे गवतीपड आहे.आता मात्र त्यावर खोडवा दाखवला आहे. ही सभासदांची फसवणूक आहे. सहकाराच्या गप्पा मारणारे महाडिक ‘राजाराम’ची सभा मात्र ५ मिनिटात गुंडाळतात, हे सभासदांनी लक्षात ठेवले पाहिजे.यावेळी ‘राजाराम’चे माजी संचालक एल. एस. पाटील, विश्वास पाटील, राजाराम निऊंगरे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने