पण हजरत पैगंबर आपल्या तत्वांपासून तसूभरही ढळले नाहीत..

मुंबई: कुरेशांनी (मक्कावासी) ह. पैगंबरांना इस्लाम धर्माची चळवळ बंद करण्याकरिता परोपरीने विनंती केली, परंतु ह. पैगंबरांनी आपले कार्य चालू ठेवले. कुरेशांचे सर्व बेत फसल्यानंतर शेवटी त्यांनी हजरत पैगंबरांच्या चुलत्यास सांगितले.अबू तालिब यांनी ह. पैगंबरांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. पण ते आपल्या तत्त्वापासून हलतील असे चिन्ह दिसेना.हजरत पैगंबरांचे चुलते अबू तालिब यांनीही या धर्माची दीक्षा घेतली. पुढे मक्का शहरातील नामांकित योद्धे, इस्लाम धर्माचे अनुयायी झाले.ज्या इस्लाम धर्मात कोणतीही जात उपजात, उच्च व कनिष्ठ, गरीब किंवा श्रीमंत असे न मानता केवळ समता व समानतेवर आधारलेला, सामान्य माणसांच्या सहज पचनी पडणारा, कोणतेही कर्मकांड अथवा अंधश्रद्धा न पाळणारा, कुणीही मध्यस्थ नसलेला व कोणत्याही ठिकाणी आकाशाखाली स्वच्छ जागी ईश्वराची करुणा मागता येईल, अशी व्यवस्था असणारा हा जो इस्लाम धर्म आज त्यांच्या अनुयायांपर्यंत पोहोचला, त्यासाठी धर्माचे संस्थापक ह. महंमद पैगंबर यांनी किती खस्ता खाल्ल्या, त्यांचा किती अनन्वित छळ झाला.त्यांच्या अनुयायांना कसे प्रसंगी मृत्यूला सामोरे जावे लागले हे पाहिले की कुणाचेही डोळे पाणावतात. परंतु ह. पैगंबर मात्र आपल्या तत्त्वापासून तसूभरही ढळले नाहीत.

आता रमजान महिना संपण्याच्या मार्गावर आहे. रमजान महिन्यातील शेवटच्या काही दिवसाचे इस्लाममध्ये फार मोठे स्थान आहे. मुस्लिम बांधव रमजान महिन्याच्या शेवटच्या दहा दिवसांत म्हणजे २१, २३, २५, २७ किंवा २९ या विशेष तारखेला मशिदीत अथवा घरी प्रार्थना करून जास्तीत जास्त पुण्य (नेकी) मिळविण्याचा प्रयत्न करतात व याच रात्रीला ‘शबे-कद्र’ असे म्हटले जाते.भारतामध्येही ‘शबे-कद्र’ची रात्री २६ व २७ वा तारखेमध्ये पाहिली जाते. ‘शबे-कद्र’ २६ वा उपवास सोडल्यानंतर सुरु होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने