"विरोधकांचं ऐक्य होणार नाही हा सत्ताधाऱ्यांचा भ्रम; ४८ पैकी ४० जागा जिंकणार"

मुंबई: विरोधी पक्षांचं ऐक्य होणार नाही, हा सत्ताधाऱ्यांचा भ्रम लवकरच तुटून पडेल आणि लोकसभा निवडणुकीत विरोधक ४८ पैकी ४० जागा जिंकतील, असा विश्वास ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. प्रादेशिक किंवा राष्ट्रीय पक्ष एकत्र येण्याला सुरुवात झाली ही आशादायी गोष्ट आहे, असंही राऊत म्हणाले आहेत.माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, "प्रादेशिक पक्ष किंवा राष्ट्रीय पक्ष असे सगळे एकत्र यायला सुरुवात झालीय, ही आशादायी गोष्ट आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली नितीश कुमार - तेजस्वी यादव यांची बैठक झाली. ते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गेंना भेटले.

काल शरद पवार राहुल गांधी आणि खर्गेंना भेटले. मुंबईत उद्धव ठाकरे आणि शरद पवार भेटले. आज मला कळलं की राहुल गांधी ममता बॅनर्जींनाही भेटणार आहेत.""सगळ्या प्रमुख विरोधी पक्षांना भेटून एकत्र येण्यासाठी राहुल गांधी काम करत आहेत. आम्हीही त्यांच्या सोबत आहोत. राहुल गांधी आणि सोनिया गांधींसोबत चर्चा झाली. तेव्हा मी सांगितलं त्यांना की महाराष्ट्रात या. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आम्ही ४८ पैकी ४० जागा जिंकू. विरोधी पक्षांचं ऐक्य होणार नाही, हा सत्ताधाऱ्यांचा भ्रम तुटून पडेल. २०२४ मध्ये सत्तापरिवर्तन नक्कीच होईल", असंही संजय राऊत पुढे म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने