भाजपला एकाही मुस्लिम मताची गरज नाही; मोदींनी फोन केलेल्या नेत्याचं वादग्रस्त विधान

कर्नाटक: कर्नाटकातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. 10 मे रोजी विधानसभा निवडणूक  होणार आहे, तर 13 मे रोजी निकाल लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य समोर आलंय.भाजपला एकाही मुसलमान मताची गरज नाही, असं विधान भाजपच्या  एका नेत्यानं केलंय. कर्नाटकातील शिवमोग्गामध्ये बोलत असताना माजी मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांनी हे विधान केलंय.विरशैव-लिंगायत समाजाच्या मेळाव्यामध्ये बोलत असताना त्यांनी हे म्हटलंय. त्यांच्यासोबत कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा हे देखील या सभेत सामील झाले होते. ईश्वरप्पा यांच्या या विधानावर लोकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवायला सुरूवात केलीये.एकानं प्रश्न विचारलाय की, भाजपच्या ‘सबका साथ सबका विकास’ या घोषणेचं काय झालं? तोही एक जुमला होता का? आणखी एका तरुणानं म्हटलंय, पंतप्रधान मोदी यांनी याच माणसाला फोन केला होता आणि त्याचा पाठिंबा मागितला होता. आता त्यानं तेढ निर्माण होईल, अशी विधानं करण्यास सुरुवात केली आहे, हे मोदी यांचं खरं रुप आहे, असं नमूद केलंय. ईश्वरप्पांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजप पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वी PM मोदींनी त्यांना फोन करुन विजयाची हमी मागितली होती.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने