IPLने वाचवली 'या' खेळाडूची कारकीर्द, एका वर्षानंतर टीम इंडियात खेळण्यासाठी सज्ज

मुंबई : आयपीएल हे एक असे व्यासपीठ आहे ज्याने संपूर्ण जगाला नेहमीच एक एक महान क्रिकेटर दिले आहेत. त्याचबरोबर टीम इंडियाला आयपीएलमधून अनेक चांगले क्रिकेटर्सही मिळाले आहेत. या लीगमधून आपले करिअर वाचवणारे अनेक खेळाडू होते.अशाच एका भारतीय खेळाडू जो टीम इंडियाकडून खेळला आहे, पण काही खराब कामगिरीमुळे तो बाहेर गेला आणि पुन्हा काय संघात परतला नाही. पण आता या खेळाडूने पुन्हा एकदा आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करत निवड समितीचे दरवाजे ठोठावले आहेत.



आयपीएल 2023 च्या 22 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघ मुंबई इंडियन्ससमोर होता. या सामन्यात मुंबईच्या गोलंदाजांसमोर केकेआरचे फलंदाज अडचणीत सापडले होते. पण एका टोकाला उभ्या असलेल्या व्यंकटेश अय्यरने मुंबईच्या गोलंदाजावर मारा सुरूच ठेवला. वेंकीने मुंबई इंडियन्सविरुद्ध 51 चेंडूत 104 धावांच्या धडाकेबाज खेळीत 6 चौकार आणि 9 षटकार ठोकले. या खेळाडूने सध्या आयपीएलची ऑरेंज कॅपही मिळवली आहे.भारतासाठी देखील व्यंकटेश अय्यरने 2021 मध्ये टी-20 पदार्पण केले आणि 2022 मध्ये त्याला एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याच्या नावावर केवळ 24 धावा आहेत. त्याचवेळी या खेळाडूला या फॉरमॅटमध्ये एकही विकेट घेता आली नाही.

टी-20 इंटरनॅशनलमध्ये 9 सामने खेळताना अय्यरने 133 धावा केल्या आहेत आणि 5 विकेट्सही घेतल्या आहेत. हार्दिक पांड्या ब्रेकवर असताना अय्यरला त्याच्या जागी पाहिले जात होते. पण तो आपली खास छाप सोडू शकला नाही.टीम इंडियासाठी तो जानेवारी 2022 मध्ये शेवटचा एकदिवसीय सामना आणि फेब्रुवारी 2022 मध्ये शेवटचा T20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला. म्हणजेच तो एका वर्षाहून अधिक काळ संघाबाहेर आहे.आयपीएलमध्ये व्यंकटेश अय्यर सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. गेल्या 3 हंगामात वेंकीने आपल्या बॅटने कमालीची ताकद दाखवली आहे. व्यंकटेशचा हा आयपीएलमधला 27 वा सामना आहे. जिथे त्याच्या नावावर 750 पेक्षा जास्त धावा आहेत, त्याची सरासरी देखील 32 च्या वर आहे आणि स्ट्राईक रेट देखील 130 पेक्षा जास्त आहे.सध्या अनेक दिग्गजांना भारताच्या टी-20 संघातून बाहेर ठेवले जात आहे. अशा परिस्थितीत हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली वेंकीला मालिकेत पुन्हा संधी दिली जाऊ शकते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने