तर तुम्ही सांगाल तिथं येतो' राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगतापांचं राणेंना ओपन चॅलेंज

अहमदनगर: अहमदनगरमधील राजकारण मागील काही दिवसांपासून तापलं आहे. भाजपचे आमदार नितेश राणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्यात अहमदनगर शहरात व्यापाऱ्यांवर झालेल्या हल्ल्यावरुन चांगलाच कलगीतुरा रंगला आहे.व्यापाऱ्यांवरील हल्ल्यानंतर आमदार राणे यांनी हिंदुंवर अन्याय होत असेल तर सहन केला जाणार नाही असा इशारा आमदार जगतापांना दिला.भाजपचे आमदार नितेश राणे आणि राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यात चांगलाच वाद रंगला आहे. राणे यांनी संग्राम जगतापांचा २०२४ च्या निवडणुकीत पराभव करून दाखवू असं थेट आव्हानच दिलं आहे.नितेश राणे अहमदनगर येथे माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, "माझ्या नजरेला उभा राहत नाही तो आमदार, उगाच माझ्या वाटेला जाऊ नका २०२४ लांब नाही, या आमदाराचा कार्यक्रम २०२४ करून टाकायचा मी प्रचाराला येणार" नितेश राणे यांच्या या आव्हानाला आमदार संग्राम जगताप यांनी जशास तसं उत्तर दिलं आहे.ते म्हणाले की, "खरं आहे आम्ही नजरेला नजर मिळवू शकत नाही कारण त्यांची थोडी उंचीची अडचण आहे. नजरेला नजर मिळवायची असेल तर त्यांनी सांगावं आम्ही तिथं येतो, आणि स्वाभिमान विलीन केलेल्या कुटुंबाची माहिती घेतली तर तुम्हाला कळून जाईल त्यांची पार्श्वभूमि, आणि नगर शहरामध्ये अशी भाषा वापरू नये अन्यथा जशाच तसं उत्तर देण्यासाठी आम्ही तयार आहोत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने