प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेत 2 लाख महिलांना अर्थसहाय्य!

मुंबई: केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेमार्फत जिल्ह्यात दोन लाख २० हजार मातांना अर्थसहाय्य देण्यात आले आहे. या योजनेंतर्गत गरोदर महिलांना सहा हजार रुपयांची मदत दिली जाते.लाभार्थींमध्ये नाशिक शहरातील सर्वाधिक ५० हजार ४३१ मातांचा समावेश आहे. त्याखालोखाल निफाड तालुक्यातील १७ हजार ५५०, तर मालेगाव महापालिका क्षेत्रातील १६ हजार ८४८ मातांचा समावेश आहे.



महिला आणि बाल विकास मंत्रालयामार्फत राबविल्या जाणाऱ्या या योजनेत महिलांना हप्त्यांमध्ये पाच हजार रूपये दिले जातात. पात्र महिला जननी सुरक्षा योजनेंतर्गत लाभार्थी असल्यास तिला अतिरिक्त एक हजार रुपये म्हणजेच एकूण सहा हजार रुपये दिले जातात.यासाठी अंगणवाडी केंद्र किंवा आरोग्य केंद्राला भेट देऊन अर्ज करता येतो. ही रक्कम थेट लाभार्थी महिलेच्या बँक खात्यात वर्ग केली जाते.याचा पहिला हप्ता अंगणवाडी केंद्रात किंवा आरोग्य सुविधेवर गर्भधारणेची नोंदणी करण्यासाठी एक हजार रुपये, दुसरा हप्ता हा गर्भधारणेच्या सहा महिन्यांनंतर २ हजार रुपये, तर तिसरा हप्ता हा पाल्याच्या जन्माची नोंदणी आणि लसीकरणाच्या वेळी २ हजार रुपये दिला जातो.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने