अबब! मुकेश अंबानींच्या ड्रायव्हरला आयटी इंजिनिअर एवढी सॅलरी

मुंबई:  आशियातील सर्वात श्रीमंतर व्यक्ती फेमस बिझिनेसमॅन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेत येत असतात. मुंबईतील त्यांचे घर एंटीलिया नेहमीच चर्चेचा विषय असतात. अंबानींच्या घरी जवळपास 600 लोकांचा स्टाफ कामाला आहे ज्यांची सॅलरी खूप जास्त आहे.तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल पण मुकेश अंबानींंची कार चालवणारा ड्रायव्हर लाखोनी सॅलरी घेतो. आज आपण त्या विषयीच जाणून घेणार आहोत.फायनेंशियल एक्सप्रेसच्या एका रिपोर्टनुसार अंबानी कुटूंंबासाठी जेवण बनविणाऱ्या शेफची सॅलरी 2 लाख रुपये आहे तर लाइव मिंटनुसार, मुकेश अंबानींच्या ड्रायव्हरची सॅलरी ही 2 लाख रुपये आहे. हा ड्रायव्हर वर्षाला 24 लाख रुपयांची कमाई करतो. मात्र हे काम एवढं सोपं नाही.प्रायव्हेट फर्मद्वारा अशा ड्रायव्हर्सची हायरिंग केली जाते. त्यांनी इंडियाच्या श्रीमंत लोकांची लग्जरी कार चालविण्याची ट्रेनिंग सुद्धा दिली जाते. लाखोंच्या सॅलरीशिवाय अंबानी कुटूंब आपल्या स्टाफमधील लोकांना अन्य सुविधाही पुरवतात.मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटूंब लग्जरी कारचे शौकीन आहे. Financial Express ने आपल्या एका रिपोर्टमध्ये सांगितले आहे की एंटीलिया हाउसमध्ये168 कारांसाठी पार्किंग स्पेस आहे ज्यामध्ये13.50 कोटी रुपयांच्या रोल्स रॉयस फँटम, 10.50 कोटींच्या मर्सिडीज बेंज एस660 आणि 8.9 कोटींची बीएमडब्ल्यू 760एलआई उभी असते. या शिवाय अंबानी कुटूंबाजवळ अनेक लग्जरी कार आहेत ज्या बुलेट प्रूफ सुद्धा आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने