रस्सीखेच! नागपुरात फडणवीसांच्या घराशेजारीच 'अजितदादा भावी मुख्यमंत्री'चे बॅनर

नागपूर: राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तीन दिवस सुट्टीवर गेले आहेत. सध्या ते साताऱ्यात आहेत. अशातच राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यात पुन्हा मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरु झाली आहे. अजित पवारांच्या सासरवाडीत भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले होते. तर तिकडे नागपुरात देवेंद्र फडणवीस यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून नागपूरात बॅनर झळकले आहेत. मात्र आता अजित पवारांचे बॅनर नागपुरातही झळकत आहेत. नागपुरात अजित पवार भावी मुख्यमंत्री असे बॅनर लागले आहे. लक्ष्मी भवन चौकात अजित पवार यांचे बॅनर झळकलं. हा चौक देवेंद्र फडणवीस यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर आहे. बॅनवर 'वचनाचा पक्का, हुकूमाचा एक्का मुख्यमंत्रीपदासाठी अजितदादाच पक्का', असं लिहिलेलं आहे. राष्ट्रवादीचे स्थानिक नेते प्रशांत पवार यांनी हे बॅनर लावले आहेत.दुसरीकडे अमित शहा आज नागपूरात दाखल होणार आहे. मात्र त्याआधीच हे होर्डिंग्ज लावण्यात येत असल्याने चर्चांना उधाण आलं आहे. आधीच अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा आहे. त्यातच नागपूर बॅनर झळकल्याने भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्र येण्याच्या चर्चां उधाण आलं आहे.याशिवाय नागपूर शहरातील बुटीबोरी परिसरात ठिकठिकाणी देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री होणार, अशा आशयाचे होर्डिंग्ज लागल्याचं दिसून आले होते. बुटीबोरी नगर परिषदेचे अध्यक्ष बबलू गौतम यांनी हे होर्डिंग्ज शहरात लावले होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने