पाण्याच्या शोधार्थ रानगव्यांची शिरोडातील भरवस्तीत भटकंती

पणजी : दक्षिण गोवा जिल्ह्यातील फोंडा तालुक्यातील शिरोडा गावातील नागरिकांमध्ये सध्या रानगव्यांची भीती पसरली आहे.पाण्याच्या शोधार्थ हे गवे भरदिवसा रस्त्यावर भटकंती करताना दिसत आहेत.
मागील दहा दिवसांत या रानगव्यांनी दोन दुचाकीस्वारांना धडक देऊन जखमी केले आहे.शिरोडा ते निरंकाल या मार्गावर वाहनांची वर्दळ दिसून येत असते. दिवसभर या रस्त्यावर वाहने येजा करत असतात. मडगाव येथे एक जोडपे स्कूटरवरून जात होते.त्यावेळी एक गवा थेट रस्त्यावर अवतरला.पण त्या जोडप्याला वाटले की ती म्हैस असेल. म्हणून त्यांनी आपली स्कूटर तशीच पुढे नेली. त्याचवेळी रानगव्याने स्कूटरला जोरात धडक दिली. यात चालक जखमी झाला असून त्याच्यावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने