२ महिन्यात या ६ कार होणार लाँच, नाव, फीचर्स किंमत पाहून व्हाल आनंदी

इंडिया नवीन कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक गुड न्यूज आहे. तुम्हाला जर नवीन कार खरेदी करायची असेल तर थोडं थांबावं लागेल. कारण, येत्या २ महिन्यात ६ नवीन कार लाँच होणार आहेत. यात हॅचबॅक पासून सेडान आणि एसयूव्ही कारचा समावेश आहे. यातील काही कार तर तुमच्या बजेट मधील आहेत. तसेच टाटाची नवीन सीएजनी कार सुद्धा लाँच करण्यात येणार आहे. म्हणजेच तुम्हाला काही दिवसाची वाट पाहावी लागणार आहे. त्यानंतर तुमच्या समोर एकापेक्षा एक जबरदस्त ऑप्शन उपलब्ध असणार आहेत. जी कंपनी नवीन कार लाँच करणार आहे. त्यात मारुती, टाटा, फोक्सवेगन, किआ आणि होंडा या कंपनीचा समावेश आहे. जाणून घ्या लवकरच लाँच होणाऱ्या या कार संबंधी सविस्तर.
​मारुती सुझुकी जिम्नी

मारुती सुझुकीची मोस्ट अवेटेड ऑफरोड एसयूव्ही जिम्नीची पहिली यूनिट तयार होऊन बाहेर आली आहे. कंपनीने आपल्या गुरूग्राम प्लांट मध्ये जिम्नीचे प्रोडक्शन सुरू केले आहे. कंपनीने याच्या पहिल्या यूनिटचा फोटो रिलीज केला आहे. हे पर्ल आर्कटिक व्हाइट कलर मध्ये आहे. मारुतीने जिम्नीला या वर्षी जानेवारी महिन्यात झालेल्या ऑटो एक्सपो २०२३ मध्ये आणले होते. यानंतर याची बुकिंग सुरू केली होती. या ५ डोर मॉडलच्या किंमतीची घोषणा अद्याप करण्यात आली नाही. परंतु, असे मानले जात आहे की, कंपनी याला जून मध्ये लाँच करणार आहे. त्यावेळी याची किंमत समोर येईल. या एसयूव्हीला २५ हजार बुकिंग मिळाली आहे. याची सुरुवातीची किंमत १० लाख रुपये असू शकते.

​टाटा अल्ट्रोज सीएनजी

टाटा अल्ट्रोज सीएनजी डीलर्सकडे पोहोचवली आहे. ही देशातील पहिली दोन सिलिंडरची सीएनजी कार आहे. सोबत यात सिलेंडरला बूट स्पेसची ट्रे च्या खाली शिफ्ट करण्यात आले आहे. म्हणजेच या कारमध्ये भरपूर स्पेस मिळेल. तर स्पेयर व्हील (स्टेपनी) ला कारच्या खालील बाजुने शिफ्ट करण्यात आले आहे. कंपनीने याची बुकिंग आधीच सुरू केली आहे. त्यामुळे या कारला डीलर्सकडे पोहोचवले जात आहे. आगामी काही दिवसात या कारला लाँच केले जाऊ शकते. परंतु, लाँचिंग आधीच या कारचे फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची डिटेल्स लीक झाली आहेत. यात ६ व्हेरियंट सीएनजी असतील. याची सुरुवातीची किंमत ७.३५ लाख रुपये असू शकते.

​किआ सेल्टॉस फेसलिफ्ट

किआने आपल्या २०२३ सेल्टॉस फेसलिफ्टला साउथ कोरियात लाँच केले आहे. आता या कारला भारतीय बाजारात लाँच करण्याची तयारी केली जात आहे. २०२३ किआ सेल्टॉस फेसलिफ्टला बुसान इंटरनॅशनल मोटर शो मध्ये आणले होते. याच्या एक्सटिरियर मध्ये अनेक बदल पाहायला मिळत आहेत. यात नवीन डिझाइन दिलेली हेडलाइट्स मिळते. यात रि-डिझाइन फ्रंट ग्रिल मिळेल. जी सध्या मॉडलच्या तुलनेत छोटी आहे. फ्रंट बंपरला मोठे करण्यात आले आहे. ज्यात मोठा एअरफ्लो मिळणार आहे. परंतु, फोग लँम्पचे पोझिशन डिझाइन समान आहे. या कारमध्ये डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर आणि टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम दोन्हीला फिक्स करण्यात आले आहे. या कारची अंदाजीत किंमत ११ लाख रुपयाच्या जवळपास असू शकते.

​होंडा इलेवेट एसयूव्ही

होंडा आपली मिड साइज एसयूव्ही एलिवेट ६ जून रोजी लाँच करणार आहे. एलिवेट मध्ये १.५ लीटर नॅचरली एस्पिरेट पेट्रोल इंजिन मिळू शकते. कंपनीने हे इंजिन होंडा सिटी मध्ये सु्द्धा दिले आहे. हे इंजिन १२१ बीएचपी पॉवर जनरेट करते. इंजिनला ६ स्पीड गियरबॉक्सशी जोडले आहे. यात हायब्रिड टेक्नोलॉजीचे इंजिनचे ऑप्शन मिळेल. ज्यात ईसीव्हीटी गियरबॉक्स मिळण्याची शक्यता आहे. हायब्रिड मॉडलचे मायलेज २७ किमी प्रति लीटर पर्यंत असू शकते. यात १०.२ इंचाची टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम पाहायला मिळू शकते. अँड्रॉयड ऑटो आणि वायरलेस अॅपल कारप्ले कनेक्टिविटीला सपोर्ट करेल. या कारची एक्स शोरूम किंमत १२ लाख ते १९ लाख रुपयांपर्यंत असू शकते.

​फोक्सवेगन व्हर्टूस आणि टायगून

फोक्सवेगनने गेल्या महिन्यात एप्रिल २०२३ मध्ये व्हर्टूस आणि टायगूनचे नवीन व्हेरियंट लाइनअपला समोल आणले होते. याच्या किंमतीचा खुलासा पुढील महिन्यात केला जाणार आहे. दोन्ही कारला टॉप स्पेक ट्रिम मध्ये १.५ लीटर टीएसआय इंजिन सोबत मॅन्युअल ६ स्पीड गियरबॉक्सचा ऑप्शन मिळेल. याशिवाय, दोन्ही व्हीकलसाठी एक नवीन जीटी एज लिमिटेड एडिशन सुद्धा पॅकेजचा भाग असेल. टायगून मध्ये कार्बन स्टील मॅट आणि डीप ब्लॅक पर्ल फिनिशचा ऑप्शन मिळेल. यासोबत टायगून स्पेशल एडिशनमध्ये दोन वेगवेगळे ट्रेल आणि स्पोर्ट थीम मिळेल.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने