राजस्थान, आंध्र, आसामचा समिलिंगी विवाहाला विरोध

नवी दिल्ली : भारतात समिलंगी विवाहांना कायेदशीर मान्यता देण्याला राजस्थान, आंध्र, आसाम या राज्यांनी विरोध केला आहे. सर्वोच्च न्यायालयात समलिंगी विवाहांच्या कायदेशीर मान्यता देण्याच्या खटल्याची सुनावणी सध्या सुरू आहे. यासंदर्भात राज्यांचे मत जाणून घेण्यासाठी केंद्र सरकारने राज्यांना पत्र पाठवले होते. 



आंध्रने केंद्राला कळवले आहे की, आम्ही विविध धर्मांच्या प्रमुखांशी चर्चा केली असून त्या सगळ्यांनी समलिंगी विवाहांना विरोध केला आहे. आसामने असे उत्तर दिले की, समलिंगी विवाहांना मान्यता म्हणजे सध्या राज्यात असलेल्या विवाह आणि वैयक्तिक कायदे यांना आव्हान असेल. तर राजस्थान सरकारने असे कळवले की, राज्याच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण खात्यानुसार, समलिंगी विवाहांना मान्यता दिल्याने समाजिक पोत बिघडेल, त्याचा सामाजिक आणि कौटुंबिक व्यवस्थेवर परिणाम होईल.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने