Budget Smartwatch : ४००० पेक्षाही कमी मध्ये मिळतेय २१ हजारांची स्मार्टवॉच, कशी घ्याल विकत?

नवी दिल्ली : Fire Boltt Invincible Plus : मागील काही वर्षांमध्ये स्मार्टवॉच हे एक असं गॅजेट झालं आहे, जे अनेकांकडे आता पाहायला मिळत आहे. म्हणजे काही काळापूर्वीच अगदी महागडं आणि काही लोकांकडेच असणारं गॅजेट म्हणून स्मार्टवॉचेस होत्या. पण त्यानंतर अनेक कंपन्यांनी बजेट स्मार्टवॉच तयार करण्यास सुरुवात केली, तशी स्मार्टवॉच विकत घेणाऱ्यांची आणि वापरणाऱ्यांची संख्या वाढू लागली. आता अगदी १००० रुपयांपासूनही स्मार्टवॉच मिळतात. अगदी लाखोंच्या घरातही स्मार्टवॉचेसची किंमत असते. दरम्यान अशीच एक महाग आणि प्रिमीयम लूक देणारी Fire Boltt ची invincible plus ही smartwatch अगदी स्वस्तात अॅमेझॉन सेलमध्ये मिळत आहे.

मेटल बॉडी, जबरदस्त डिझाईन आणि भारी फीचर्स असणारी ही वॉच सेलमध्ये केवळ ४००० रुपयांना मिळत आहे. अॅमेझॉनवर सध्या ग्रेट समर सेल सुर आहे. ज्यात सर्वच गोष्टींवर तगडं डिस्काउंट मिळत आहे. अशामध्ये स्मार्टवॉचेसवरही भारी सूट मिळत असून फायरबोल्ट कंपनीची ही Fire Boltt invincible plusस्मार्टवॉच फार स्वस्तात मिळत आहे. या वॉचची मूळ किंमत २० हजारांहून अधिक आहे. पण या ग्रेट समर सेलमध्ये ८० टक्के डिस्काउंच मिळत असल्याने याची किंत ४,४९९ रुपये झाली असून बँकिंग ऑफर्सच्या मदतीनं आणखी १००० वाचवता येणार आहेत.


Fire Boltt invincible plus चे फीचर्स
तर ही वॉच १.४३ इंचेसच्या AMOLED डिस्प्लेसह 460x460 पिक्सेल रेज्य़ुलेशनसह आणि 600nits ब्राईटनेससह येते. अधिक चांगल्या अनुभव देण्याकरता 2.5D फुल लॅमिनेशन कर्व्ह या वॉचला देण्यात आलं आहे. तसंच यामध्ये ३०० हून अधिक स्पोर्ट्स मोड आणि कितीतरी हेल्थ फीचर्स देण्यात आले आहेत. तसंच ११० बिल्ट वॉच फेसेस असून AI Voice Assistant देखील यात देण्यात आलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने