भारत डायनॅमिक्स लिमिटेडमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; ‘या’ १०० जागांसाठी होतेय भरती, २३ जूनपर्यंत करु शकता अर्ज

 भारत डायनॅमिक्स लिमिटेड (BDL) या सरकारी संस्थेमध्ये लवकरच भरतीला सुरुवात होणार आहे. कंपनीने यासंबंधित एक सूचनापत्रक जाहीर केले आहे. भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करावी लागणार आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया सध्या सुरु आहे. संस्थेच्या bdl-india.in या अधिकृत वेबसाइटवर अर्ज उपलब्ध आहेत. वेबसाइटवर या मेगाभरतीबद्दलची सविस्तर माहितीही देण्यात आली आहे.बीडीएलच्या भरतीअंतर्गत १०० रिक्त जागांसाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे. यांमध्ये प्रोजेक्ट ऑफिसर, प्रोजेक्ट इंजिनिअर अशा पदांचा समावेश आहे. भरतीमध्ये सहभागी होऊन नोकरी मिळवण्यासाठी उमेदवारांकडे मान्यता प्राप्त शैक्षणिक संस्थेकडून BE/ BTech/ ME/ MTech/ CA ची पदवी असणे आवश्यक आहे. विशेष गुणवत्ता असलेल्या उमेदवारांना कंपनीकडून प्राधान्य दिले जाईल. २३ जून ही भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करायची शेवटची तारीख आहे.

भरतीमध्ये सहभागी होणाऱ्या उमेदवाराचे कमाल वय २८ असणे आवश्यक असल्याचे संस्थेच्या सूचनापत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे. आरक्षित वर्गातील उमेदवारांना वयाच्या अटीमध्ये सूट दिली जाणार आहे. ऑनलाइन अर्ज केल्यानंतर निवड प्रक्रियेला सुरुवात होईल. शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखत यांच्या मार्फत योग्य उमेदवारांना नोकरी एका वर्षाच्या करार पद्धतीने दिली जाईल.

प्रवेश शुल्क

भारत डायनॅमिक्स लिमिटेडच्या या भरतीमध्ये अर्ज करणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला ठराविक रक्कम प्रवेश शुल्क म्हणून भरावे लागणार आहे. प्रमुख वर्गातील उमेदवारांकडून अर्जासह ३०० रुपये आकारले जातील. प्रवेश शुल्काबाबत सवलतींची माहिती मिळवण्यासाठी उमेदवारांना वेबसाइटची मदत होईल. तेथे भरतीचे अपडेट्सही मिळतील.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने