गिअरची कटकट नको म्हणून ऑटोमॅटिक कार घेताय? आधी हे तोटे वाचाच

बऱ्याच जणांना कार चालवताना वारंवार गिअर बदलणं कंटाळवाणं वाटतं. त्यामुळे ऑटोमॅटिक गिअरबॉक्स असणाऱ्या गाड्यांना हे लोक पसंती देतात. ऑटोमॅटिक गाड्या चालवताना ड्रायव्हरला जास्त मेहनत करावी लागत नाही. त्यामुळे या गाड्या चालवण्यासाठी अगदी आरामदायक असतात. मात्र, अशा गाड्यांचे काही तोटेदेखील आहेत.
आजकाल ऑटोमॅटिक गिअरबॉक्स असणाऱ्या गाड्यांच्या किंमती कमी झाल्या आहेत. कित्येक कंपन्यांनी आपल्या नवीन गाड्या ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल अशा दोन्ही प्रकारांमध्ये लाँच करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ऑटोमॅटिक गाड्या घेण्याकडे लोकांचा कल वाढतो आहे. तुम्हीदेखील जर ऑटोमॅटिक गाडी घेण्याचा विचार करत असाल, तर थोडं थांबा. कारण या गाड्यांचे तोटे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.



मायलेज
मॅन्युअल ट्रान्समिशन असणाऱ्या गाड्यांच्या तुलनेत ऑटोमॅटिक गाड्या खूप कमी मायलेज देतात. याला कारण म्हणजे, मॅन्युअल गाड्यांमध्ये गिअर आपोआप कमी-जास्त केला जातो. म्हणजेच, तुम्ही वेग कमी केला की आपोआप गिअर कमी होतो, तर वाढवल्यावर आपोआप वाढतो. हे वारंवार आणि आपोआप होत असल्यामुळे यामध्ये अधिक इंधन वापरलं जातं. मॅन्युअलमध्ये तुम्ही स्वतः गिअर शिफ्ट करून वेग कमी-जास्त ठेवण्याचा निर्णय घेता.
ओव्हरटेक करण्यास अडचण
ऑटोमॅटिक कारमध्ये तुम्ही जसं स्पीड वाढवाल तसा गिअर बदलत जातो. त्यामुळे या प्रोसेसला मॅन्युअलच्या तुलनेत अधिक वेळ लागतो. मॅन्युअल कारमध्ये तुम्ही झटक्यात गिअर बदलून भरपूर स्पीड वाढवू शकता. त्यामुळे ओव्हरटेक करण्यासाठी ऑटोमॅटिक गाड्या कुचकामी ठरतात.
किंमत
सध्या ऑटोमॅटिक गाड्यांची किंमत कमी होत असली, तरी मॅन्युअल गाड्यांच्या तुलनेत ती अजूनही जास्तच आहे. त्यामुळे ऑटोमॅटिक गाडी ही तुलनेने तुम्हाला महागच बसेल.
रोलबॅक
उतारावर ऑटोमॅटिक गाड्या अगदी धोकादायक ठरू शकतात. मध्येच थांबल्यानंतर पुन्हा एक्सलरेटर दाबल्यानंतर पुढे जाण्याऐवजी या गाड्या बऱ्याच वेळा मागे जातात असं दिसून आलं आहे. यामुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता असते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने