एक व्यक्ती किती PPF खाती उघडू शकते? काय आहे मर्यादा? जाणून घ्या नियम

आजच्या काळात बचत खूप महत्त्वाची आहे. जर तुम्हालाही गुंतवणुकीद्वारे मोठी बचत करायची असेल, तर पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच पीपीएफमध्ये गुंतवणूक करणे तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो.
पण तुम्हाला माहिती आहे का की गुंतवणूकदार किती पीपीएफ खाती उघडू शकतो आणि याबाबत काय नियम आहेत. आज आपण त्याबद्दल येथे सविस्तर माहिती घेणार आहोत.
पीपीएफमध्ये गुंतवणूक केल्यास 7.1 टक्के दराने व्याज मिळते. PPF वर उपलब्ध असलेला हा व्याजदर जुलै-सप्टेंबर तिमाहीत 8 टक्क्यांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.


अशा परिस्थितीत, पीपीएफमध्ये गुंतवणूक करणे खूप फायदेशीर आहे, परंतु त्यापूर्वी त्याच्याशी संबंधित नियम जाणून घेणे खूप महत्वाचे आहे.
PPF खाते कोण उघडू शकते?
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, लहान बचत योजनांमधील सर्वात लोकप्रिय गुंतवणूक योजना आहे. कोणताही भारतीय रहिवासी स्वतःच्या नावाने उघडू शकतो.
तसेच पालकांपैकी एक अल्पवयीन मुलासाठी किंवा मुलीसाठी पीपीएफ खाते उघडू शकतो. दोन्ही पालकांचा मृत्यू झाल्यास, आजी-आजोबा नातवंडांचे पालक म्हणून पीपीएफ खाते उघडू शकतात.
एखादी व्यक्ती किती पीपीएफ खाते उघडू शकते?
PPF नियमांनुसार, एखादी व्यक्ती फक्त एक PPF खाते उघडू शकते. कोणत्याही व्यक्तीला एकापेक्षा जास्त पीपीएफ खाते उघडण्याची परवानगी नाही. पीपीएफचा लाभ घेण्यासाठी गुंतवणूकदार पत्नी आणि अल्पवयीन मुलाच्या नावाने पीपीएफ खाती उघडतात.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने