नवी दिल्ली : Royal Enfield Bikes Price Sale: Royal Enfield कंपनीच्या मोटरसायकलची भारतात तसेच परदेशात प्रचंड क्रेझ आहे. दरम्यान कंपनीचे MD सिद्धार्थ लाल हे देखील याला एक जागतिक ब्रँड बनवण्यासाठी बरेच प्रयत्न करत आहेत. रॉयल एनफिल्ड ही कंपनी दरवर्षी एकापेक्षा जास्त दमदार बाईक्स लाँच करत आहे. भारतीय बाजारपेठेत सध्या 350 cc टू-व्हीलर सेगमेंटचे वर्चस्व दिसत आहे आणि क्लासिक ३५० ही कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी मोटरसायकल आहे. ज्यानंतर रॉयल एनफिल्डची सर्वात स्वस्त बाईक हंटर ३५० चा क्रमांक लागतो. कंपनी ६५० सीसी सेगमेंटमध्ये देखील तीन भारी बाईक विकते, ज्यामध्ये सर्वात महाग सुपर मेटियर ६५० आहे. रॉयल एनफील्डच्या या मोटरसायकल्सचा विक्री अहवाल आणि किंमतीबद्दल सविस्तर जाणून घेऊ…
रॉयल एनफील्ड बाईक्सचा एप्रिल २०२३ विक्री अहवाल
रॉयल एनफील्ड क्लासिक ३५०- २६७८१ युनिट्स
रॉयल एनफिल्ड हंटर ३५०- १५७९९ युनिट्स
रॉयल एनफील्ड बुलेट ३५०- ८३९९युनिट्स
रॉयल एनफील्ड मेटीयोर ३५०- ७५९८ युनिट्स
रॉयल एनफिल्ड इलेक्ट्रा ३५०- ३७७९ युनिट्स
रॉयल एनफिल्ड हिमालयन - ३५२१ युनिट्स
रॉयल एनफिल्ड ६५० ट्विन्स - १८६५ युनिट्स
रॉयल एनफील्ड सुपर मेटीयोर ६५०– ११३९युनिट्स
रॉयल एनफील्ड प्रसिद्ध बाईक्सच्या किंमतीची यादी
Royal Enfield Classic 350 ची किंमत १.९० लाख ते २.२१ लाख रुपये
Royal Enfield Hunter 350 ची किंमत १.५० लाख ते १.७५ लाख रुपये आहे
Royal Enfield Bullet 350 ची किंमत १.५१ लाख ते १.६६ लाख रुपये आहे
Royal Enfield Meteor 350 ची किंमत २.०१ लाख ते २.२२ लाख रुपये आहे
Royal Enfield Himalayan ची किंमत २.१६ लाख ते २.२८ लाख रुपये आहे
Royal Enfield Scram 411 ची किंमत २.०३ लाख ते २.०९ लाख रुपये आहे
Royal Enfield Super Meteor 650 ची किंमत ३.४९ लाख ते ३.७९ लाख रुपये आहे
Royal Enfield Interceptor 650 ची किंमत ३.०३ लाख ते ३.३१ लाख रुपये आहे
Royal Enfield Continental GT 650 ची किंमत ३.१९ लाख ते ३.४५ लाख रुपये आहे