हिंदू धर्मात चार धामांचं काय आहे महत्व?

 

चार धाम यात्रेबाबत तुम्ही ऐकलेच असेल. हिंदू धर्मात चार धाम यात्रेला विशेष महत्व आहे. भारतात स्थित चार धाम चार दिशेला आहेत. तेव्हा हिंदू धर्मात चार धामचे महत्व काय आहे ते जाणून घेऊयात.

बद्रीनाथ धाम हे भगवान विष्णूला समर्पित आहे. याची स्थापना भगवान रामाने केली असे मानले जाते. बद्रीनाथ धामचे दरवाजे एप्रिलच्या शेवटच्या महिन्यात किंवा मे महिन्याच्या सुरुवातीला उघडले जातात तर नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात बंद केले जातात.

रामेश्वर धाम हे भोलेनाथांना समर्पित असलेले धाम तामिळनाडूच्या रामनाथपुरम जिल्ह्यात समुद्रकिनारी वसलेले आहे. याशिवाय हे धाम १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक मानले जाते.



पुरी धाम भगवान विष्णूचा अवतार असलेल्या श्री कृष्णाला समर्पित हे धाम ओडिशातील पुरी शहरात आहे. या मंदिराची पवित्र रथयात्रा जगप्रसिद्ध आहे. मंदिरातील मुख्य देवता भगवान जगन्नाथ, त्यांचा मोठा भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा आहेत.

द्वारका धाम हे भगवान श्रीकृष्णाला समर्पित असलेले पवित्र निवासस्थान गुजरातच्या पश्चिम टोकाला आहे. तीर्थ पुराणानुसार द्वारका धाम मोक्ष देणार्‍या सात पुरींपैकी एक मानली गेली आहे.

वेद आणि पुराणात चार धाम यात्रा अत्यंत शुभ मानली गेली आहे. चारधामची यात्रा करणाऱ्या व्यक्तीला सर्व पापांपासून मुक्ती मिळते, असे मानले जाते. यासोबतच आयुष्यात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतात. हिंदू धर्मात चार धाम यात्रेचे दोन प्रकार आहेत.

एक बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्रीला भेट देण्यासाठी आणि दुसरे बद्रीनाथ, जगन्नाथ, रामेश्वरम आणि द्वारका धामला. ही सर्व पवित्र स्थळे देशाच्या विविध भागात आहेत, त्यामुळे याला बडा चार धाम यात्रा असेही म्हणतात.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने