अमेरिका-ब्रिटन बाजूला राहिले, बर्म्युडा ठरला जगातील सर्वात महागडा देश

बर्म्युडा आणि स्वित्झर्लंड हे राहण्यासाठी जगातील सर्वात महागडे देश असल्याचा दावा वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सच्या अहवालात करण्यात आला आहे. 140 देशांच्या अहवालात असे म्हटले आहे की बर्म्युडामध्ये राहण्याची किंमत खूप जास्त आहे. या यादीत स्वित्झर्लंड दुसऱ्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे यूएस, यूके, जपान आणि रशियामध्ये राहणे बर्म्युडाच्या तुलनेत खूपच स्वस्त आहे. पण मग बर्म्युडामध्ये असं काय आहे की इथे राहणं खूप महाग आहे. बर्म्युडामध्ये महागाईची अनेक कारणं आहेत.

म्हणूनच बर्म्युडा महाग आहे

बर्म्युडा हे उत्तर अटलांटिक महासागर स्थित एक बेट आहे. ही यूके ओव्हरसीज टेरिटरी आहे. येथील समुद्रकिनारा आणि समुद्राचे सौंदर्य पर्यटकांना आकर्षित करते. बेटांचा देश असल्याने इथे शेती नाही. आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट इतर देशांतून आयात केली जाते. येथील बहुतांश जीवनावश्यक वस्तू अमेरिकेतून आयात केल्या जातात. वाहतूक खर्च, कस्टम ड्युटी आणि मजुरी यामुळे त्या गोष्टी महाग होतात.इतर देशांच्या तुलनेत इथे राहणाऱ्या लोकांना एका गोष्टीसाठी कितीतरी पट किंमत मोजावी लागते. इतकंच नाही तर इथलं राहणं, जेवण, विमा आणि इतर खर्चही इतर देशांच्या तुलनेत रेकॉर्डब्रेक आहेत. हे पर्यटकांसाठी अधिक महाग आहे कारण त्या वस्तूंवर अधिक नफा घेतला जातो. एवढं असूनही पर्यटक मोठ्या प्रमाणात गुलाबी वाळूच्या या देशात येतात. बर्म्युडामधील हॉटेलमध्ये एका रात्रीच्या मुक्कामासाठी 25,000 रुपये मोजावे लागतात.

पगार इतर देशांपेक्षा चांगला

विशेष म्हणजे महागडा देश असल्याने इथल्या लोकांचे उत्पन्नही तेवढेच आहे. इतर देशांच्या तुलनेत कर्मचाऱ्यांना जास्त पगार मिळतो. महागाईचा परिणाम इथल्या लोकांच्या उत्पन्नावर आणि पगारावर दिसून येतो.

बर्म्युडा, स्वित्झर्लंड, केमन आयलंड, बहामास, आइसलँड, सिंगापूर, बार्बाडोस, नॉर्वे, डेन्मार्क आणि ऑस्ट्रेलिया हे जगातील टॉप 10 सर्वात महागडे देश आहेत.तर राहण्यासाठी पाकिस्तान हा जगातील सर्वोत्तम देश आहे.

जगातील शीर्ष 10 स्वस्त देशांमधे पाकिस्तान, इजिप्त, भारत, नायजेरिया, बांगलादेश, तुर्की, अर्जेंटिना, इंडोनेशिया आणि रशिया यांचा समावेश आहे. या देशांमध्ये राहण्याची किंमत सर्वात कमी आहे. म्हणूनच त्यांना यादीत तळाशी ठेवलं आहे. जगातील महागड्या देशांची यादी दरवर्षी बदलते. यावर्षीच्या यादीत पाकिस्तान 140 व्या आणि भारत 138 व्या स्थानावर आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने