Flipkart Big Saving Days Sale ती तारीख आली समोर, iPhone 14 सह Android फोन्सवरही बंपर डिस्काउंट ऑफर

नवी दिल्ली : Flipkart Big Saving Days Sale : एकीकडे Amazon Prime Day Sale जवळ येत असून आता फ्लिपकार्टनेही आपला धमाकेदार वार्षिक सेल फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेजची तारीख जाहीर केली आहे. विशेष म्हणजे याची तारीखही १५ जुलै असणार असून हा सेल १५ जुलै ते १९ जुलैपर्यंत सुरु राहणार आहे. तर या बिग सेव्हिंग डेज सेलमध्ये १५ जुलैपासून iPhone 14 आणि इतर अनेक स्मार्टफोनवर दमदार सवलतीच्या ऑफर्स मिळणार आहेत. या सेलमध्ये iPhone 14 थेट ६०,९९९ रुपयांना खरेदी करता येईल, जो मूळ किंमतीपेक्षा तब्बल १२ हजारांनी कमी आहे. याशिवाय अँड्रॉइड स्मार्टफोन, इअरफोन, स्मार्ट टीव्ही, लॅपटॉप, गेमिंग अॅक्सेसरीज आणि इतर इलेक्ट्रॉनिक उत्पादनांवरही बंपर सूट दिली जाईल. तब्बल ८० टक्क्यांपर्यंतही सवलत मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला स्मार्टफोन, टीव्हीसह कोणतेही इलेक्ट्रॉनिक उत्पादन घ्यायचे असेल, तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे.किती दिवस सुरू राहील सेल?

फ्लिपकार्टचा बिग सेव्हिंग डेज सेल १५ जुलैपासून सुरू होईल आणि १९ जुलै २०२३ पर्यंत सुरू राहील. या सेलमध्ये 128GB स्टोरेज वेरिएंटसह iPhone 14 ६०,९९९ रुपयांना खरेदी करता येईल. तथापि, फ्लिपकार्टने अद्याप अधिकृत डिस्काउंट ऑफर जाहीर केलेली नाही. आधीच्या सेलमध्ये, iPhone 14 ६७,९९९ रुपयांना सादर करण्यात आला होता.

अँड्रॉइड स्मार्टफोन्सवर बंपर डिस्काउंट ऑफर

  • iPhone 14 व्यतिरिक्त, Android स्मार्टफोन्सच्या खरेदीवर मोठ्या डिस्काउंट ऑफर दिल्या जात आहेत. सेलमध्ये, अॅक्सिस बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डच्या खरेदीवर १० टक्के इन्स्टन्ट सवलत ऑफर दिली जात आहे. Realme 11 मालिका स्मार्टफोन स्वस्तात विक्रीसाठी ऑफर केले जाऊ शकतात.

  • तसंच इअरफोन, स्मार्ट टीव्ही, स्मार्टवॉच आणि लॅपटॉप आणि इतर गेमिंग अॅक्सेसरीज यांसारख्या इलेक्ट्रॉनिक उत्पादनांवर सेलमध्ये ८० टक्क्यांपर्यंत सूट दिली जाऊ शकते.

  • तसंच फ्रीज, फॅन आणि वॉशिंग मशिन आणि एसीवर ७५ टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने