दरवाढीमुळं टोमॅटोची वाढली 'लाली'; किलोला मिळतोय 'इतका' भाव

 रीच्या उत्पन्नात घट झाल्याने बाजारपेठेत तूरडाळीच्या भावात दीडपटीने वाढ झाली आहे. किलोचे भाव १५० रुपयांच्या दरम्यान वाढले आहेत. त्यामुळे तूरडाळीच्या आमटीला महागाईचा तडका बसल्याची स्थिती आहे.

दरम्यान टोमॅटोचे दर वाढल्याने टोमॅटो उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. गृहिणींकडून तूरडाळीऐवजी मूगडाळीचा वापर होऊ लागला आहे. खाणावळीत तुरीची आमटी कमी झाली आहे. त्याला पर्याय म्हणून भाज्या व कडधान्यांची उसळ दिली जात आहे.
कच्चा मालाच्या भावात वाढ झाल्याने पोह्याचे भाव ४० रुपयांवरून ५० रुपये झाले आहेत. चिरमुरेचे भाव किलोस १५० रुपयांपर्यंत वाढले आहेत. त्यामुळे भेळ व्यावसायिक अडचणीत आले आहेत. भाजी मंडईत टोमॅटोचे भाव किलोस ५० रुपयांपर्यंत वाढल्याने टोमॅटोची लाली वाढली आहे. पाऊस लांबल्याने हिरव्या भाजी पाल्यांची आवक कमी झाली आहे.

मेथी पेंडीचा दर १५ रुपयांवरून ३० रुपये, पालक पेंडीचा भाव २० रुपये झाला आहे. हिरव्या मिरचीच्या भावात दीडपटीने वाढ झाली आहे. किलोचा भाव ८० रुपयांवरून १२० रुपयांपर्यंत वाढला आहे. कडधान्यांना मागणी वाढू लागल्याने कडधान्यांच्या भावातही किलोस २० ते ३० रुपयांनी वाढ झाली आहे. खाद्यतेलाच्या किमती कमी होऊ लागल्याने दिलासा मिळाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने