भारत आणि आयर्लंडचे सामने नेमके किती वाजता सुरु होणार, जाणून घ्या योग्य वेळ...

डब्लिन : भारत आणि आयर्लंड यांच्यामध्ये आता टी-२० सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. पण या टी-२० सामन्यांतील सामने नेमके किती जावता सुरु होणार, याबाबतची माहिती आता समोर आली आहे.

भारत आणि आयर्लंड यांच्यातील पहिला सामना १८ ऑगस्टला होणार आहे. या सामन्यासाठी मैदानाची पाहणी करण्यासाठी दोन्ही पंच संध्याकाळी ६.०० वाजता मैदानात येतील. जर सामना सुरु करण्यात काही समस्या नसेल तर संध्याकाळी ७.०० वाजता टॉस हाऊ शकतो. टॉस झाल्यावर दोन्ही संघांचे कर्णधार आपले संघ जाहीर करतील. त्यानंतर दोन्ही संघांतील खेळाडू काही काळ मैदानात सराव करू शकतात. टॉस झाल्यावर अर्ध्या तासात मॅच सुरु होईल, म्हणजेज संध्याकाळी ७..३० वाजता या मालिकेतील सामन्यांना सुरुवात होणार आहे. त्यामुळे भारतीय वेळेनुसार हा सामना संध्यकाळी ७.३० ते रात्री ११.पर्यंत पाहता येऊ शकतो.आयर्लंड मालिकेसाठी भारतीय संघ : जसप्रीत बुमराह (कर्णधार), रिंकू सिंग, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, यशस्वी जैस्वाल, शाहबाज अहमद, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, जितेश शर्मा (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकिपर), अर्शदीप सिंग, आवेश खान, मुकेश कुमार, प्रसिद्ध कृष्णा, रवी बिश्नोई .

भारत आणि आयर्लंडच्या टी-२० मालिकेचे वेळापत्रक

पहिला टी-२० सामना - १८ ऑगस्ट, मालाहाइड

दुसरा टी-२० सामना - २० ऑगस्ट, मालाहाइड

तिसरा टी-२० सामना - २३ ऑगस्ट, मालाहाइड.

भारतासाठी ही मालिका महत्वाची असेल. भारतीय संघ या मालिकेत ३ टी-२० सामने खेळणार आहे. त्यानंतर भारतीय संघ आशिया चषकासाठी रवाना होणार असल्याचे म्हटले जात आहे. कारण आता तीच एक मोठी स्पर्धा होणार आहे आणि त्यानंतर वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. त्यामुळे आशिया चषक ही स्पर्धा भारतीय संघासाठी महत्वाची समजली जात आहे. पण आशिया चषकासाठी भारतीय संघाची निवड करत असताना या मालिकेतील कामगिरी पाहिली जाणार आहे. त्यामुळे भारताचे युवा खेळाडू या सामन्यात कशी कामगिरी करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने