भारतातील स्वर्गसौंदर्य पाहायचंय? मग या ठिकाणांना भेट द्यायलाच हवी

जेव्हा जेव्हा सुंदर ठिकाणांचा उल्लेख येतो तेव्हा बरेच लोक परदेशी देशांचा विचार करतात. पण भारत देशातही अनेक सुंदर आणि मनमोहक ठिकाणे आहेत. जर तुम्हाला प्रवासाची आवड असेल तर आयुष्यात एकदा तरी या ठिकाणांना नक्की भेट द्या. भारतातील ही ठिकाणे पाहिल्यानंतर तुमचे मन प्रसन्न होईल. जाणून घेऊयात अशाच काही ठिकाणांबाबबद्दल.
१) गुरेज वॅली, काश्मीर

या ठिकाणाला दुसरा स्वर्ग म्हटले तरी वावगे ठरणार नाही. उंच उंच डोंगरांच्या कुशीत वसलेल्या या ठिकाणचे निसर्ग सौंदर्य नक्कीच तुम्हाला या जागेच्या प्रेमात पाडेल. गुरेज वॅली ही LoC च्या अगदी खाली असल्याने हे ठिकाण अतिशय सुरक्षित मानले जाते. LoC जवळ असून देखील सुरक्षित कसे ? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल.

याचे उत्तर म्हणजे LoC जवळ असल्याने भारतीय सैन्याचे येथे कायम लक्ष असते. गुरेज वॅली येथे विविध प्रकारची झाडे, वनस्पती आणि फुले देखील मोठ्या प्रमाणात सापडतात. गुरेज वॅली येथे जाण्यास मे ते सप्टेंबर हा कालावधी उत्तम असतो.

२) फुगताल गॉम्पो, जम्मू काश्मीर

या जागेचे नाव कदाचित फार कमी लोकांना माहित असेल. फुगताल गॉम्पो या जम्मू काश्मीर मध्ये असणाऱ्या जागेची काही वेगळीच खासियत आहे. आशियातील सर्वात दूरवर असलेला मठ या ठिकाणी पाहायला मिळतो.

झंस्कार येथील डोंगरात असणारी गुहा देखील पाहण्यासारखी आहे एवढाच नव्हे तर येथून सरप नदीचे मनमोहक दृश्य देखील पाहायला मिळते. विशेष म्हणजे फुगताल गॉम्पो येथे जाण्यास रस्ता नाहीये आणि तिथे जायचे असल्यास २-३ दिवस गिर्यारोहण करून जावे लागते. फुगताल गॉम्पो येथे जाण्यास जून ते सप्टेंबर हा कालावधी उत्तम असतो.

३) परुळे भोगवे, महाराष्ट्र

महाराष्ट्रातील हे ठिकाण अतिशय सुंदर आणि विविधतेने नटलेले आहे. समुद्र किनाऱ्यावरील ही ठिकाणे फार कमी लोकांना माहित आहेत. परुळे मध्ये मस्त मालवणी खाण्याचा आस्वाद घेता येतो आणि तसेच फार्म स्टे करण्याचा सुंदर अनुभव घेता येतो.

शहराच्या गजबजाटापासून दूर जरा निवांत आणि पारंपरिक आयुष्याचा अनुभव अतिशय सुखद असतो. येथे जाण्यास ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हे महिने उत्तम. जवळच असणारे देवबाग आणि निवती हे समुद्र किनारे देखील अतिशय सुंदर आणि स्वच्छ आहेत.

४) चोपता, उत्तराखंड

स्वर्ग कधी तुम्ही डोळ्याने पहिला आहे का? नाही ना ना? मग चोपता या उत्तराखंड मधील सुंदर ठिकाणाला तुम्ही एकदा भेट देऊन हा सुखद अनुभव घ्यायलाच हवा. बलाढ्य हिमालय आणि बर्फाची चादर पांघरून घेतलेल्या अनेक डोंगर रंग येथून दिसतात.

हे दृश्य इतके सुंदर असते कि तासंतास त्याकडे पाहताच राहावे असे तुम्हालाही नक्कीच वाटेल. जवळच असणारे कोटेश्वर महादेव मंदिर आणि स्वामीनारायण मंदिर देखील आवर्जून पाहावे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने