सकाळी उठल्यावर थकवा जाणवतोय? मग हे उपाय करून पाहा

चांगल्या आरोग्यासाठी पुरेशी झोप मिळणे आवश्यक असते. आपल्या शरीरासाठी दररोज 7-8 तास झोप गरजेची आहे. जर झोप झाली नसेल तर संपूर्ण दिवस आऴसवाणा जातो. अपूर्ण झोप अनेक आजारांना निमंत्रण देते.

सकाळी उठल्यानंतरही तुम्हाला थकवा जाणवत असेल तर याचे कारण तुमचे बिझी शेड्यूल असू शकते. कामाच्या ताणावामुळे तुम्ही पुरेशी झोप घेऊ शकत नाहीत. याचा परिणाम शरीरावर होतो.
बॉडी मसाज

आयुर्वेदात ही फार जुनी पद्धत मानली जाते. ही थेरपी करून तुम्ही तुमचा आळस दूर करू शकता. सकाळी उठल्यानंतर संपूर्ण शरीराला सुमारे 20 ते 25 मिनिटे मसाज करा. याने तुम्हाला फ्रेश वाटेल. त्याचबरोबर शरीरातील रक्ताभिसरणही चांगले होते.

सूर्योदयापूर्वी उठा

जर तुम्हाला सकाळी उठणे हे मोठे कष्टाचे काम वाटत असेल. तर यासाठी तुमच्या या सवयीमध्ये बदल करा. यासाठी सूर्योदयापूर्वी उठण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमचे मन ताजेतवाणे राहिल. सकाळी लवकर उठल्यानंतर योगासने करा.

आहारात बदल करा

आहाराचा समतोल साधता न आल्याने शरीर आळशी होते. यामुळे तेलकट आणि मसालेदार पदार्थांचा आहार कमी घेता येतील हे पहा. निरोगी राहाण्यासाठी हिरव्या भाज्या आणि कडधान्यांचा आहारात समावेश करा. तसेच गरम आणि पुर्ण शिजवलेले अन्न खावे.

दिवसा झोपू नका

दिवसा झोपण्याची सवय असणाऱ्यांना रात्री लवकर झोप येत नाही. त्यामुळे दिवसा न झोपण्याची सवय लावा.

दिनक्रम बनवा

जी कामे केल्यानंतर शांत झोप मिळेल अशी कामे झोपण्याआधी जरुर करा. काहींना झोपण्याआधी पुस्तक वाचण्याची सवय असते तर काहीजण ध्यान करतात.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने