स्किनची स्पेशल केअर करायचीय? मग या 5 गोष्टींसह वापरा ग्लिसरीन, चेहऱ्यावर दिसेल नॅचरल ग्लो

ऋतू कुठलाही असो त्वचेची काळजी घेणे गरजेचेच असते. तुमचा चेहरा प्रफुल्लित असेल तर तुम्हालाही कुठलेही काम करण्यात रस असतो. त्वचेच्या समस्येमुळे अनेकांचा कॉन्फि़डंससुद्धा कमी होतो. तेव्हा कमी वेळात तुमच्या त्वचेची खास काळजी घेण्याच्या काही टिप्स जाणून घ्या.

यूट्यूबवर तुम्ही अनेक ब्युटी केअर व्हिडिओज बघितले असेल पण कुठलेही प्रोडक्ट वापरण्याआधी ते तुमच्या स्किन केअरसाठी योग्य आहेत की नाही याची माहिती घेणेही तेवढेच महत्वाचे ठरते. त्वचेसाठी फक्त ग्लिसरीनचा वापर करू नये. ग्लिसरीनसह तुम्ही हे ५ नॅचरल प्रोडक्ट्स वापरलेत तर तुम्हाला फायदा होऊ शकतो. चला तर ग्लिसरीनच्या वापराबाबत आणि त्याच्या काही फायद्यांबाबत सविस्तर जाणून घेऊया.
रोझ वॉटर आणि ग्लिसरीन

रोझ वॉटर आणि ग्लिसरीनच्या मदतीने तुम्हाला त्वचेच्या ड्रायनेसपासून सुटका मिळू शकते. त्यासाठी ग्लिसरीनमध्ये रोझ वॉटर मिक्स करून चेहऱ्यावर लावा. आणि काही वेळानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. हा उपाय केल्यास तुमच्या चेहऱ्यावर नॅचरल ग्लो येईल.

मुलतानी माती आणि ग्लिसरीन

त्वचेवरील डाग आणि ब्लॅक स्पॉट्स दूर करण्यासाठी मुलतानी माती आणि ग्लिसरीन तुम्ही ट्राय करू शकता. यासाठी मुलतानी माती आणि ग्लिसरीन मिक्स करून त्याचा फेस पॅक चेहऱ्यावर लावा. काही वेळाने चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.

मध आणि ग्लिसरीन

स्किन केअरसाठी मध आणि ग्लिसरीनचा वापर तुम्ही पिगमेंटेशनची समस्या दूर करण्यासाठी करू शकता. तर अॅक्नी आणि पिंपल घालवायचे असतील तर ग्लिसरीन आणि मध मिक्स करून ते चेहऱ्यावरण लावणे बेस्ट ठरेल.

लिंबू आणि ग्लिसरीन

त्वचेवर खाज, बॅक्टेरिया किंवा ड्रायनेसची समस्या असेल तर ती दूर करण्यासाठी तुम्ही लिंबू आणि ग्लिसरीनची मदत घेऊ शकता. यांचे मिश्रण तुम्ही चेहऱ्यावर लावा. या उपायाने तुमचा चेहरा क्लिन अँड क्लियर दिसेल.

स्किन केअरसाठी ग्लिसरीनचे फायदे

ग्लिसरीनला चेहऱ्यासाठीचा बेस्ट मॉश्चरायझिंग एजंट मानलं जातं. ग्लिसरीनच्या वापराने त्वचेचा मऊपणा आणि पिंपल्स, अॅक्नी आणि डाग दूर होतात.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने