2,000 च्या नोटेबाबत अ‍ॅमेझॉनचा मोठा निर्णय, 19 सप्टेंबरपासून लागू होणार नवीन नियम

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) बँकेत 2,000 रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदत दिली होती. ती आता जवळ आली आहे. बँकांव्यतिरिक्त, लोकांना RBI च्या 19 क्षेत्रीय कार्यालयांमध्ये 2000 रुपयांच्या नोटा बदलून देण्याची सुविधा देखील दिली आहे.

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनीही लोकांना त्यांच्या नोटा निर्धारित तारखेपर्यंत बँकांमध्ये जमा करा किंवा त्या बदलून घ्याव्यात, असे आवाहन केले होते.




सरकारने चलनात असलेल्या 500 आणि 1,000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर नोव्हेंबर 2016 मध्ये 2,000 रुपयांच्या नोटा चलनात आणण्यात आल्या. यानंतर, बँकांमध्ये इतर मूल्यांच्या नोटा पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाल्यानंतर, 2,000 रुपयांच्या नोटा चलनात आणण्याचे उद्दिष्ट पूर्ण झाले.

तुमच्याकडेही 2,000 रुपयांच्या नोटा असतील, तर तुमच्याकडे त्या बदलण्याची संधी आहे, त्यामुळे हे काम लवकरात लवकर पूर्ण करा. कारण आता जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी Amazon ने 2,000 रुपयांच्या नोटेबाबात नवीन नियम जारी केला आहे.

Amazon कंपनीने कॅश ऑन डिलिव्हरी सेवेवर 2,000 रुपयांची नोट स्वीकारण्याबाबत ग्राहकांना माहिती दिली आहे.

Amazon कंपनीने म्हटले आहे की 19 सप्टेंबरपासून 2,000 रुपयांच्या नोटा कॅश ऑन डिलिव्हरी (सीओडी) पेमेंट म्हणून स्वीकारल्या जाणार नाहीत. अॅमेझॉनने म्हटले आहे की, ते सध्या 2,000 रुपयांच्या नोटा स्वीकारत आहेत. पण 19 सप्टेंबर 2023 पासून 2,000 रुपयांच्या चलनी नोटा स्वीकारल्या जाणार नाहीत.

एकाच वेळी किती नोटा बदलल्या जाऊ शकतात?

आरबीआयच्या परिपत्रकानुसार, तुम्ही तुमच्या बँकेत जाऊन 2,000 रुपयांची नोट बदलू शकता. सध्या 2,000 रुपयांच्या नोटा बदलण्याची मर्यादा 20 हजार रुपयांपर्यंत आहे.

नोटा जमा करण्यासाठी काय नियम आहेत?

लोक त्यांच्या बँक खात्यात 2,000 रुपयांची नोट जमा करू शकतात. नोटा बदलण्यासाठी बँक कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारणार नाही. तुम्ही कोणत्याही बँकेचे ग्राहक नसले तरी तुम्ही त्या बँकेत जाऊन नोट बदलून घेऊ शकता.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने