पांढऱ्या केसांच्या समस्येतून सुटका मिळवण्यासाठी शोधताय नैसर्गिक उपाय? मग हे फुल वापरून केस करा काळे

हल्लीच्या धकाधकीच्या लाइफस्टाइलमुळे लहान मुलांचेही केस पांढरे होऊ लागले आहेत. मानसिक - शारीरिक ताणतणाव, आजार, इत्यादी कारणांमुळे अकाली केस पांढरे होण्याच्या समस्यांमुळे काही जण त्रस्त असतात. पांढरे केस काळे करण्यासाठी काही जण केमिकलयुक्त ट्रीटमेंटचा आधार घेतात. पण यामुळे केसांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होतेय, हे लक्षात घ्या.  

हे नुकसान टाळण्यासाठी शक्यतो केस काळे करण्यासाठी नैसर्गिक औषधोपचारांची मदत घेण्याचा प्रयत्न करावा. या लेखाच्या माध्यमातून आपण अशाच काही घरगुती उपचारांची माहिती जाणून घेणार आहोत. ज्यांचा आपण हेअर केअर रूटीनमध्ये समावेश केल्यास केसांशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत मिळू शकते. जास्वंदाचे फुल तुम्हाला माहिती असेल, पण या फुलाचा योग्य प्रकारे वापर केल्यास केसांचे आरोग्य निरोगी राहण्यास बरीच मदत मिळते, हे तुम्हाला माहीत होतं का? चला याबाबत जाणून घेऊया सविस्तर माहिती…

नारळाचे तेल आणि जास्वंदाचे फुल

पांढऱ्या केसांच्या समस्येपासून सुटका हवी असल्यास जास्वंदाची पाच फुले घ्या. तुमच्याकडे पाटा वरवंटा असेल तर त्यावर ही फुले वाटून त्याची पेस्ट तयार करा. यानंतर एक वाटीमध्ये पेस्ट काढून घ्यावी. यामध्ये थोडेसे नारळाचे तेल आणि मेथीची पावडर मिक्स करावी. सर्व सामग्री व्यवस्थित एकजीव करून घ्या. 

पेस्ट तयार झाल्यानंतर मुळांसह संपूर्ण केसांना लावा. दोन तासांनंतर सौम्य शॅम्पू आणि थंड पाण्याने केस स्वच्छ धुऊन घ्या. हा उपाय केल्यास तुमचे केस घनदाट व मजबूत होण्यास मदत मिळेल.

आवळ्याचा रस आणि जास्वंदाच्या फुलाचे हेअर पॅक

जास्वंदाच्या फुलांची पेस्ट तयार करा. या पेस्टमध्ये आवळ्याचा रस मिक्स करावा. मिश्रण व्यवस्थित एकजीव करावे. पेस्ट तयार झाल्यानंतर मुळांसह संपूर्ण केसांना लावा. तासाभरानंतर थंड पाणी व सौम्य शॅम्पूने केस स्वच्छ धुऊन घ्यावेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने