Gaganyaan Mission : 'गगनयान' मोहिमेबाबत मोठी अपडेट! लवकरच होणार फ्लाइट टेस्ट, तयारी सुरू

भारताच्या महत्त्वाकांक्षी गगनयान मोहिमेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. इस्रो लवकरच या मोहिमेची मानवरहित फ्लाइट टेस्ट घेणार आहे. फ्लाइट टेस्ट व्हेईकल अबॉर्ट मिशन-1 (TV-D1) या मोहिमेसाठीची तयारी सुरू करण्यात आली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार ही चाचणी 25 किंवा 26 ऑक्टोबर रोजी पार पडू शकते. इस्रोने मात्र याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही. क्रू एस्केप सिस्टीमची ही चाचणी असणार आहे. म्हणजेच, या यानातून अंतराळवीर कशा प्रकारे बाहेर पडतील याची ही चाचणी असणार आहे. या चाचणीवेळी रॉकेटमध्ये मानव नसणार आहेत.गगनयान मोहीम काय आहे?

या मोहिमेद्वारे इस्रो पृथ्वीच्या खालच्या कक्षेत (LEO) मानवयुक्त अवकाशयान पाठवेल. मानवांना पृथ्वीच्या खालच्या कक्षेत पाठवणे आणि त्यासाठी स्वदेशी क्षमता विकसित करणे हे इस्रोचे उद्दिष्ट आहे. चांद्रयान-3 आणि आदित्य एल-1 नंतर इस्रोची ही सगळ्यात मोठी मोहीम असणार आहे. या मोहिमेसाठी अमेरिकेतील अंतराळ संशोधन संस्था नासा देखील इस्रोची मदत करणार आहे.

काही दिवसांपूर्वी या मोहिमेतील अंतराळवीरांची ट्रेनिंग सुरू असल्याचा व्हिडिओ समोर आला होता. तसंच त्यापूर्वी ड्रोग पॅराशूटची देखील यशस्वी चाचणी घेण्यात आली होती. यामुळे या मोहिमेच्या तयारीला वेग आल्याचं स्पष्ट होतंय.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने