पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 27 ऑक्टोबर रोजी इंडिया मोबाईल काँग्रेसचे उद्घाटन झाले. यामध्ये पंतप्रधानांनी जिओच्या स्पेस फायबर तंत्रज्ञानाची माहिती घेतली. यासोबतच, यात पुन्हा एकदा Jio Glass ची चर्चा देखील सुरू झाली आहे. गेल्या वर्षी भारतात जिओ 5G लाँच करताना पंतप्रधानांनी हे जिओ ग्लासेस स्वतः वापरले होते.
जिओ ग्लासेस हे नवीन प्रॉडक्ट नाही. कंपनीने 2020 सालीच हे पहिल्यांदा समोर आणले होते. गुगल आणि मेटाने तयार केलेल्या स्मार्ट ग्लासेस प्रमाणेच हे जिओचे स्मार्ट ग्लास आहेत. हेदेखील आपल्या यूजर्सना ऑगमेंटेड रिअॅलिटी (AR) आणि व्हर्चुअल रिअॅलिटीचा (VR) अनुभव देतात.
जिओने खरंतर गुगलसोबत मिळून हे ग्लासेस तयार केले आहेत. यामध्ये एक कॅमेरा, स्पीकर आणि दोन मायक्रोफोन देण्यात आले आहेत. यामध्ये 3D अवतार, होलोग्राफिक कंटेंट आणि नॉर्मल व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अशा गोष्टी अनुभवता येतात. हे गॉगल आपल्या स्मार्टफोनला देखील कनेक्ट करता येतात.
अद्याप हे स्मार्ट गॉगल्स भारतात लाँच करण्यात आले नाहीत. याची लाँचिंग डेट आणि किंमत लवकरच समोर येण्याची शक्यता आहे. गुगल आणि मेटाच्या स्मार्ट ग्लासेसच्या तुलनेत याची किंमत कमी असेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.