इन्कम टॅक्स परतावा अजून आला नाही? आता आयकर विभाग देईल व्याज, जाणून घ्या किती मिळेल Interest

इन्कम टॅक्स रिटर्न (आयकर) भरण्यामागे बहुतेक करदात्यांचे उद्दिष्ट TDS (टीडीएस) किंवा इतर मार्गाने कापलेली कराची रक्कम परत मिळवण्याचे असते. जर कोणतेही कर दायित्व नसेल, तर प्राप्तिकर विभाग कट केलेले पैसे परताव्याच्या स्वरूपात परत करतो. पण तुम्हाला माहिती आहे का की रिफंडसोबत करदात्यांना व्याजही मिळते. ज्या करदात्यांना रिफंडचे पैसे मिळतात त्यांनाही व्याज दिले जाते, असे आयकर विभागाने म्हटले आहे.
आयकर परताव्यावर व्याज

आयकर भरून महिने उलटले पण अजूनही खात्यात रिफंड क्रेडिट झाला नसेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. इन्कम टॅक्स रिटर्न भरूनही आयकर विभागाने परतावा जारी केला नसेल, तर ही बातमी नक्की वाचा. आयकर विभागाकडून परतावा देण्यास झालेल्या विलंबावर तुम्हाला व्याज मिळेल की नाही हे जाणून घ्या आणि जर होय, तर तुम्हाला किती व्याज मिळेल.

परतावा मिळण्यास विलंब झाल्यास मिळेल व्याज

गेल्या काही वर्षांपासून आयकर विभागाने रिफंड जारी करण्याची प्रक्रिया जलद केली आहे, पण आजही अनेकजण रिफंडच्या प्रतीक्षेत आहेत. रिफंडला विलंब झाल्यास आयकर विभाग करदात्यांना व्याज देत असल्याची माहिती आहे, पण हे व्याज कोणत्या परिस्थितीत दिले जाते हे तज्ज्ञांकडून जाणून घेतले.

आयकर कायद्याच्या कलम १४३(१) अंतर्गत करदात्यांना परताव्याची सूचना दिली जाते. मात्र परतावा जारी करण्यास विलंब झाल्यास आयकर विभाग एप्रिलपासून दरमहिना ०.५% व्याज म्हणजे वार्षिक ६% व्याज देते. यानंतर पुढील वर्षी इतर स्रोतांमधून मिळणाऱ्या उत्पन्नावरील व्याजावर कर भरावा लागतो. म्हणजे पुढील वर्षी या व्याजाच्या रूपात झालेल्या उत्पन्नावर कर भरावा लागेल आणि तुम्हाला कोणतीही सूट मिळत नाही. १०० रुपयेही व्याज मिळाले तर त्यावरही कर भरावा लागेल.

व्याजाचे पैसे केव्हा मिळणार

प्राप्तिकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार करदात्यांना १ एप्रिलपासून व्याज दिले जाते म्हणजे तुम्हाला जेव्हाही परतावा जारी केला जाईल तेव्हा तुम्हाला त्याच्यावर ०.५% व्याज जोडले जाईल. १ एप्रिलपासून व्याजाची गणना केली जाईल.

उदाहरणार्थ समजा जर तुम्ही ३१ जुलै रोजी आयकर रिटर्न भरले आणि तुम्हाला ३१ ऑगस्ट रोजी परतावा जारी केला गेला तर यावर तुम्हाला पाच महिन्यांचे व्याजही मिळेल. अशाप्रकारे तुम्हाला एकूण रकमेवर २.५ टक्के व्याज मिळेल त्यासह जर तुमचा रिफंड २० हजार रुपये असेल तर ५०० रुपये व्याज दिले जाईल.

परताव्यावर कधी कर आकारला जाईल?

देय तारखेच्या आत ITR दाखल करणाऱ्या करदात्यांना परताव्याच्या रकमेवर ०.५०% मासिक व्याज दिला जाईल. ITR परतावा हे उत्पन्न आहे जे करदात्याने संबंधित आर्थिक वर्षासाठी आधीच दाखल केले. आयटीआरच्या मूळ रकमेवर कोणतेही व्याज नाही, परंतु या परताव्यावर मिळालेले व्याज त्या वर्षाच्या उत्पन्नात आधीच जोडले जाते, त्यामुळे कर स्लॅबनुसार करपात्र असणार नाही.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने