PVR Subscription : केवळ 70 रुपयांत पाहता येणार मूव्ही, तेही थिएटरमध्ये! पीव्हीआर आणणार सबस्क्रिप्शन प्लॅन - रिपोर्ट

चित्रपट पाहण्याची खरी मजा ही थिएटरमध्येच येते. मात्र, आजकाल चित्रपटगृहात जाणं म्हणजे 500-1000 रुपयांना फटका ठरलेलाच आहे. यावरच उपाय म्हणून PVR थिएटर्स एक सबस्क्रिप्शन प्लॅन आणण्याच्या विचारात आहेत. यामुळे प्रेक्षकांना महिन्याला दहा चित्रपट केवळ 699 रुपयांमध्ये पाहता येणार आहेत.

मनी कंट्रोलने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. PVR Inox थिएटरमध्ये प्रेक्षकांची संख्या वाढवण्यासाठी हा निर्णय घेतला जाऊ शकतो, असं यामध्ये सांगण्यात आलं आहे. कंपनीच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 35 ते 40 वर्षे वयोगटातील प्रेक्षकांना थिएटरमध्ये आणण्यासाठी ही योजना राबवण्यात येईल.
कसा असणार प्लॅन?

हा 699 रुपयांचा मासिक प्लॅन असणार आहे. यामध्ये एका व्यक्तीला एका महिन्यात दहा चित्रपट पाहता येतील. यामध्ये एक अट अशी असणार आहे, की प्लॅनमधील चित्रपट केवळ सोमवार ते गुरुवार या दिवसांत पहावे लागतील. शुक्रवार ते रविवार चित्रपट पाहण्यासाठी गेल्यास वेगळं तिकीट काढावं लागेल. 

कंपनीचा हा प्लॅन दक्षिण भारत आणि इनसिग्निया, आयमॅक्स अशा प्रीमियम स्क्रीनसाठी उपलब्ध नसणार आहे. या प्लॅनमध्ये यूजर्स एका दिवसाला केवळ एकच तिकीट खरेदी करू शकणार आहे. शिवाय तिकीट खरेदी करताना यूजर्सना आपलं आयडी कार्ड देखील सोबत बाळगावं लागणार आहे.

हा प्लॅन लाँच झाल्यास ओटीटी प्रमाणे सबस्क्रिप्शन प्लॅन आणणारी पीव्हीआर ही पहिलीच थिएटर चेन ठरेल. कोरोना काळात थिएटर्स बंद असल्यामुळे ओटीटीकडे वळालेला प्रेक्षकवर्ग चित्रपटगृहांकडे वळवण्यासाठी या योजनेचा फायदा होऊ शकतो.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने