शेअरने पकडला रॉकेट स्पीड, लखपती झाले करोडपती; पाहा कोणता आहे ‘हा’ स्टॉक

बॅग बनवणारी भारतीय कंपनी सफारी इंडस्ट्रीजने शेअर बाजारातील आपल्या गुंतवणूकदारांची झोळी भरली आहे. गेल्या सहा महिन्यात कंपनीच्या शेअर्सनी ७५ टक्क्यांपर्यंत उडी घेतली आहे तर या वर्षाच्या सुरुवातीपासून कंपनीने १५०% नफा कमावला असून आता कंपनी आपला शेअरहोल्डर्सना भेट देण्याच्या तयारीत आहे. कंपनीच्या आगामी संचालक समितीच्या बैठकीत (बोर्ड मीटिंग) शेअरहोल्डर्सना बोनस शेअर्स देण्याबाबत विचार केला जाऊ शकतो.

कंपनीच्या संचालक समितीची बैठक उद्या १ नोव्हेंबरला म्हणजेच बुधवारी होणार असून यामध्ये दुसऱ्या तिमाहीचे निकाल, बोनस शेअर्स आणि लाभांश यावर निर्णय घेतला जाईल. तसेच कंपनी निधीही उभारणार असल्याची माहिती शेअर बाजाराला देण्यात आली आहे.
सफारी इंडस्ट्रीजचे शेअर्स स्प्लिट

यापूर्वी सफारी इंडस्ट्रीजने आपल्या शेअर्स स्प्लिटही केले आहेत. अशा स्थितीत सध्या शेअर्सची दर्शनी किंमत दोन रुपये असून २२ सप्टेंबर २०१७ रोजी कंपनीने १० रुपयेचे दर्शनी मूल्य दोन रुपयात स्प्लिट केले असून त्यादरम्यान कंपनीने आपले शेअर्स पाच तुकड्यांमध्ये स्प्लिट करण्यात आले होते.

दरम्यान आता १ नोव्हेंबरला बोनस मिळण्याच्या शक्यतेमुळे गुंतवणूकदारांमध्ये सकारात्मक वातावरण आहे. त्याचवेळी गेल्या महिन्यात SBI लाइफ इन्शुरन्सने या कंपनीत गुंतवणूक केल्याचेही वृत्त समोर आले होते. एसबीआय Life ने सुमारे २.०५ लाख शेअर्स खरेदी केले होते, ज्याची सरासरी किंमत ३,७७५ रुपये होती. तर गुंतवणुकीचे एकूण मूल्य सुमारे ७७.३८ कोटी रुपये होते.

कंपनीचा व्यवसाय जाणून घ्या

सफारी इंडस्ट्रीज लगेज (बॅग) सामानाचे उत्पादन आणि व्यापाराचा व्यवसाय करते. हार्ड लगेज आणि सॉफ्ट लगेज या दोन मुख्य श्रेणी असून हार्ड लगेज प्रामुख्याने पॉलीप्रोपीलीन (पीपी) आणि पॉली कार्बोनेट (पीसी) बनलेले असते. सफारी गुजरातमधील हलोल येथील प्लांटमध्ये इन-हाऊस उत्पादन करते. मऊ लगेज वेगवेगळ्या प्रकारच्या कापडांपासून बनवले जाते आणि मुख्यतः सफारीद्वारे आयात केले जाते. कंपनीच्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये लगेज, बॅकपॅक, स्कूल बॅग, मुलींच्या फॅशन बॅग आणि प्रवासी लगेजचा समावेश आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने