Low BP : कमी रक्तदाब असल्यास सतर्क राहा! रक्तदाब कमी झाल्यास 'हे' उपाय करा

डोळ्यासमोर अंधारी येणे, अचानक भोवळ येणे यासारख्या समस्या जाणवत असे. अचानक लो बीपी झाल्यावर पाच घरगुती उपाय ठरतील फायदेशीर. अशावेळी काय घरगुती उपाय कराल हे समजून घेणे गरजेचे आहे.बीपी कमी झाल्यास काय कराल?

अचानक लो बीपी झाल्यास चक्कर येऊ शकते. तसेच थकवा यासारख्या समस्या जाणवतात.

हातापायांना मरगळ येऊन ताकद निघून जाणे यासारख्या समस्या जाणवतात. अशावेळी तात्काळ मीठ, साखर पाणी प्यावे.

बीपी लो होता इलेक्ट्रॉल पावडरचे पाणी प्यावे. यामुळे बीपी नॉर्मल होण्याची शक्यता असते.

जर घरी इलेक्ट्रॉल पावडर नसेल तर लिंबू पाणी उपयोगी ठरते. इलेक्ट्रॉल पावडर घरी ठेवावे .

कमी रक्तदाबावर कॅफिन मदत करते. कॉफीला पाण्यात उकळून प्यावी. ज्यामुळे बीपी नॉर्मल होऊ शकते. शक्य असल्यास चहा पिऊ शकतात.

डाएटची घ्यावी काळजी

कमी रक्तदाबाचा त्रास असलेल्या व्यक्तीने आपल्या डाएटची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. या लोकांनी उपवास करणे सहसा टाळावे. फार काळ उपाशी राहू नये. लो बीपीवर उपयुक्त केळ, मखाना, पपई, मुळा, पालक यासारखे पदार्थ खावेत.

मीठ : अति मीठ शरीरासाठी घातक असले तरीही लो बीपीचा त्रास असणाऱ्या व्यक्तीने मीठाचा समावेश आहारात आवर्जून करावा. व्यायाम करताना एनर्जी मेंटेन ठेवण्यासाठी लिंबू पाणी प्यावे.

कोमट पाणी : कोमट पाण्याने देखील लो बीपीचा त्रास कमी होतो. त्यामुळे थोडा थकवा जाणवला तर कोमट पाणी प्यावे. कोमट पाणी आरोग्यासाठी देखील चांगले असते.

गरम दूध : अचानक शरीरातील रक्तदाब कमी झाला तर गरम दूध देखील याचा त्रास कमी करण्यासाठी मदत करते. लो बीपीचा त्रास जाणवलास गरम दूध प्यावे. गरम पाणी आणि गरम दूध शरीरासाठी चांगलेच असते.

बीपी कमी होण्याची कारणे

चुकीची लाईफस्टाईल, प्रोसेस्ड फूड आणि फास्ट फूडचे अधिक सेवन

जेनेटिक हायपरटेंशन

जास्त स्मोकिंग

जास्त मद्यप्राशन करणे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने