69th National Film Awards: राष्ट्रपतींच्या हस्ते पार पडणार राष्ट्रीय पुरस्कार सोहळा, कोण आहेत पुरस्कारार्थी जाणून घ्या!

दरवर्षीप्रमाणे यंदाही 69व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याला सुरुवात होत आहे. 24 ऑगस्ट रोजी या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती. आता राष्ट्रीय पुरस्कार 17 ऑक्टोबर म्हणजेच आज हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे.

नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे हा सोहळा पार पडणार आहे. यात देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू विजेत्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित करतील. अशा परिस्थितीत साऊथ इंडस्ट्रीचा सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि दिग्दर्शक राजामौली आणि आलिया भट्ट हे सेलिब्रिटी दिल्लीत दाखल झाले आहेत.

मनोरंजन विश्वातील प्रतिष्ठेचा मानला जाणारा हा पुरस्कार भारत सरकारकडून चित्रपट, साहित्य आणि कला क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या कलावंताना दिला जातो.




हा सोहळा कुठे आणि कधी पाहता येईल असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर हा सोहळा दुपारी दीड वाजता सुरु होईल सुरु होईल, ज्याचे थेट प्रक्षेपण आणि प्रसारण डीडी नॅशनल चॅनल आणि यूट्यूब चॅनेलवर होणार आहे.

त्याचबरोबर डीडी नॅशनल च्या सोशल मीडियावर देखील या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याबद्दल माहिती देण्यात येणार आहे.

या कार्यक्रमासाठी अल्लू अर्जुन, दिग्दर्शक राजामौली, संगीतकार एमएम कीरावानी, गायक एसएस कार्तिकेय एसएस राजामौली दिल्लीत पोहचले. त्याच्या 'आरआरआर' या चित्रपटाला 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सहा वेगवेगळ्या श्रेणींमध्ये पुरस्कार मिळाले आहेत.

रॉकेट्री - द नम्बी इफेक्ट' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार आणि सलील कुलकर्णी दिग्दर्शित 'एकदा काय झालं' हा मराठी सिनेमा सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार देण्यात येणार आहे.

कोणाला मिळाणार कुठला पुरस्कार?

सर्वोत्कृष्ट चित्रपट - 'रॉकेट्री : द नांबी इफेक्ट'

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन - निखिल महाजन (गोदावरी)

सर्वोत्कृष्ट अभिनेता - अल्लू अर्जून (पुष्पा)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - आलिया भट्ट (गंगूबाई काठियावाडी) आणि क्रिती सेनन (मीमी)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - पल्लवी जोशी (द कश्मीर फाइल्स)

सर्वोत्कृष्ट गायिका - श्रेया घोषाल

सर्वोत्कृष्ट संवाद लेखक - गंगूबाई काठियावाडी

सर्वोत्कृष्ट हिंदी सिनेमा - सरदार उधम

सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा - एकदा काय झालं

सर्वोत्कृष्ट स्टंट कोरिओग्राफी - आरआरआर

सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्स - आरआरआर

सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन - पुष्पा

सर्वोत्कृष्ट एडिटर - गंगूबाई काठियावाडी

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने