केस गळणं, पांढरे होणं, लठ्ठपणा, बद्धकोष्ठता, मधुमेह भयंकर रोग कायमचे छुमंतर करतं हे एक पान, दिवसातील या वेळी खा

स्टँडअप कॉमेडियन आणि रॅपर Munawar Faruqui सध्या बिग बॉस सीझन 17 अगदी गाजवतो आहे. आपल्या अर्थपूर्ण कविता आणि स्पष्टवक्त्या शैलीने तो लोकांची मनेही जिंकत आहे. या शोमधील सर्व स्पर्धक खऱ्या आयुष्यातील दैनंदिन दिनचर्येचे शो मध्येही पालन करताना दिसत आहेत. त्यापैकी एक मुनव्वर फारुकी हा देखील सवयीप्रमाणे रोज पहाटे रिकाम्या पोटी कढीपत्ता चघळताना दिसतो आहे.

आता तुम्हालाही मुनव्वर कडीपत्ता का चघळतो असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो की ही एक आरोग्यदायी सवय आहे. दिवसाची सुरूवात 7-10 कडीपत्ते चावून केली तर अनेक मोठ्या आजारांवर मात करता येते. केस गळणे, केस पांढरे होणे, डायबिटीज, अल्सर, लठ्ठपणा आणि असे अनेक आजार बरे करण्याची शक्ती या इवल्याशा पानांमध्ये आहे.
कढीपत्त्यामध्ये असणारे पोषक तत्व

कार्बोहायड्रेट्स, एनर्जी, फायबर, फॉस्फरस, मॅग्नेशियम, तांबे आणि खनिजे कढीपत्त्यात आढळणारे मुख्य पोषक घटक आहेत. शिवाय कढीपत्ता हा जीवनसत्त्वे ए, बी, सी आणि बी 2 ने समृद्ध देखील आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कडीपत्ता देखील लोह आणि कॅल्शियमचा चांगला स्रोत असल्याचे म्हटले जाते. त्यामध्ये निकोटिनिक ऍसिड, अँटिऑक्सिडंट्स, अमिनो ऍसिड आणि फ्लेव्होनॉइड्स यासारखी जीवनसत्त्वे देखील असतात.

कढीपत्त्याचे सेवन कसे करावे?

कढीपत्ता कसा खावा ते आयुर्वेदिक डॉक्टर दिक्षा भावसार यांनी सांगितले आहे. त्या म्हणतात की, तुम्ही एक एक पान पण थेट चावूनच खाऊ शकता आणि नंतर त्यावर थोडे पाणी पिऊ शकता किंवा काही पाने एका कप पाण्यात 5-7 मिनिटे उकळू शकता आणि मग ती गाळून ते पाणी उबदार असतानाच प्या. केसांच्या आरोग्याशिवाय इतर अनेक विकारांवरही यामुळे मात करण्यास मदत होते.

केस पांढरे होणे आणि केस गळणे थांबते

जर तुमचे केस प्रचंड गळत असतील तर कढीपत्ता त्यावर नियंत्रण ठेवण्यास मदत करेल. सकाळी उठल्याबरोबर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे एक ग्लास कोमट पाणी प्यायले पाहिजे. काही मिनिटांनंतर, तुम्ही काही ताजी कढीपत्त्याची पाने चावून खाऊ शकता. पाने नीट चावून घ्या आणि 30 मिनिटे थांबून मगच नाश्ता करा. कढीपत्त्यात व्हिटॅमिन सी, फॉस्फरस, लोह, कॅल्शियम आणि निकोटीनिक अॅसिड भरपूर प्रमाणात असते.

पचनक्रिया वाढते

रिकाम्या पोटी कढीपत्ता खाल्ल्याने पोटाचे आजारच होत नाहीत. हे पाचक एंजाइम्स digestive enzymes सक्रिय करते आणि आतड्यांचे आरोग्य सुधारते. यामुळे शौचाला गेल्यावर शौच अगदी सहज मऊ होऊन बाहेर पडतो. यामुळे बद्धकोष्ठतेची समस्याही दूर होते. कढीपत्त्यात सौम्य रेचक गुणधर्म असल्याचे आयुर्वेदात म्हटले आहे. हे तुमच्या शरीरातील पित्ताचे प्रमाण संतुलित करू शकतात. अपचनाची समस्या कमी करण्यासाठी तुम्ही काही कढीपत्त्याची पाने आणि लिंबाच्या रसाची पेस्ट बनवून त्याचे सेवन करू शकता. ही पेस्ट किंवा थेट कढीपत्ताच ताकात मिसळून पिणे सुद्धा आहे उत्तम!

मॉर्निंग सीकेनेस आणि मळमळ

कढीपत्ता मॉर्निंग सिकनेस, मळमळ आणि उलट्यांशी लढण्यासाठी देखील उपयुक्त आहे. कढीपत्ता पचन वाढवतो ज्यामुळे या समस्यांवर उपचार करण्यास मदत होते. तुम्हालाही असा त्रास होत असेल तर 6 ताजी कढीपत्त्याची पाने धुवून कोरडी करून अर्थात सुकवून घ्या आणि अर्धा चमचा तुपात तळून ती थंड करून खा.

ब्लड शुगर कंट्रोल होते

प्राण्यांच्या संशोधनात असे दिसून आले आहे की कढीपत्त्याचा अर्क रक्तातील उच्च साखरेची पातळी कमी करण्यास मदत करू शकतो आणि मधुमेह-संबंधित लक्षणांपासून संरक्षण करू शकतो.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने