तुम्ही Incognito मोड मध्ये काय बघता हे देखील होतं सेव्ह; अशी डिलीट करा हिस्ट्री

इंटरनेट जगातील अब्जावधी लोकांना जोडण्याचं काम करतं. ह्यात ब्राऊजरमधील इनकॉग्निटो मोड युजर्सना प्रायव्हेट इंटरनेट ब्राउजिंगचा अनुभव देत आहे. परंतु अनेकदा युजर्सची ब्राउजिंग हिस्ट्री ऑनलाइन लीक होते, ह्यात इनकॉग्निटो मोड मधील हिस्ट्रीचा देखील समावेश आहे. ह्या समस्येवर एक उपाय आमच्याकडे आहे, आम्ही तुम्हाला इनकॉग्निटो मोड हिस्ट्री कशी डिलीट करायची हे सांगणार आहोत.

Incognito mode म्हणजे काय?

इंटरनेट प्रायव्हसीची गरज पाहून गुगल क्रोमच्या टीमनं २००८ मध्ये इनकॉग्निटो मोड आणला होता. तेव्हापासून इंटरनेट ब्राउजिंग हिस्ट्री प्रायव्हेट ठेवण्यासाठी ह्या मोडचा वापर केला जात आहे. ह्याचा वापर विद्यार्थी, प्रोफेशनल्स आणि बिजनेस मध्ये देखील केलाजातो. इनकॉग्निटो मोड वापरणाऱ्यांची संख्या वाढत आहे.
ह्या मोडमध्ये युजरची ब्राउजिंग हिस्ट्री, कुकीज, किंवा साइट डेटा तुमच्या डिवाइसवर साठवली जात नाही. तसेच ह्या मोडमधील तुमची अ‍ॅक्टिव्हिटी ब्राऊजर हिस्ट्रीमध्ये देखील दिसत नाही. सर्व वेबसाइट्सना तुम्ही नवीन युजर वाटता. परंतु तुमची इनकॉग्निटो मोड मधील हिस्ट्री डिवाइसवर सेव्ह असते ती फक्त सहज दिसत नाही.

Incognito Mode मधील हिस्ट्री कशी करायची डिलीट?

इनकॉग्निटो मोड मधील हिस्ट्री डिलीट करायची की नाही हे तुम्ही ठरवू शकता. तुम्ही तुमच्या पीसी आणि मोबाइलवरील हिस्ट्री डिलीट करू शकता. मोबाइल फोनवर इंटरनेटचा वापर वाढल्यामुळे हिस्ट्रीकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे तुमची ब्राउजिंग हिस्ट्री डिलिट करायला विसरू नका. चला पाहूया पद्धत.

Windows वर इनकॉग्निटो मोड मधील हिस्ट्री डिलिट कशी करायची

तुमच्या प्रायव्हसीसाठी DNS cache चा वापर करून इनकॉग्निटो मोड मधील हिस्ट्री कशी डिलीट करायची हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. ती डिलीट करण्यासाठी

 • सर्वप्रथम, स्टार्ट मेन्यूमध्ये जाऊन ‘cmd’ टाईप करा आणि कमांड प्रॉम्ट ओपन करा. त्यानंतर त्यावर क्लिक करून Run as administrator सिलेक्ट करा.
 • त्यात ‘ipconfig/flushdns’ ही कमांड टाकून एंटर दाबा. त्यामुळे तुमची DNS cache डेटा डिलीट होईल.

मॅक मधील इनकॉग्निटो मोड हिस्ट्री डिलीट कशी करायची

मॅकमध्ये तुम्हाला टर्मिनलचा वापर करावा लागेल. त्यासाठी पुढील स्टेप फॉलो करा:

 • सर्वप्रथम Go ओपन करा.
 • त्यानंतर Utilities ओपन करा.
 • त्यानंतर Terminal ची निवड करा.
 • त्यानंतर ‘udo dscacheutil -flushcache; sudo killall -HUP mDNSResponder’ ही कमांड टर्मिनल टाका.
 • शेवटी तुमच्या कंप्यूटरचा पासवर्ड टाकून DNS cache क्लियर करण्यासाठी एंटर दाबा.

Android वर इनकॉग्निटो मोडमधील हिस्ट्री कशी डिलीट करायची

लॅपटॉप आणि पीसी नंतर मोबाइल डिवाइसवरील इनकॉग्निटो मोड कशी डिलीट करायची हे पाहू. सुरवात अँड्रॉइड पासून करू.

 • सर्वप्रथम अँड्रॉइडवर गुगल क्रोम ब्राऊजर ओपन करा आणि युआरएलच्या जागी ‘chrome://net-internals/#dns’ हे टाकून एंटर करा.
 • त्यांनतर डावीकडे असलेल्या DNS ऑप्शन वर क्लिक करा आणि नंतर Clear host cache वर क्लिक करा.
 • अशाप्रकारे तुम्ही अँड्रॉइड मधील इनकॉग्निटो मोड मधील हिस्ट्री डिलीट करू शकता.

iPhone मधील इनकॉग्निटो मोडमधील हिस्ट्री डिलिट कशी करायची

आयफोनमध्ये इनकॉग्निटो मोड हिस्ट्री डिलीट करणं खूप वेगळं आहे. त्यासाठी तुम्हाला पुढील स्टेप्स फॉलो कराव्या लागतील:

 • तुमच्या आयफोन वर वरच्या उजव्या कॉर्नरवरून स्वाइप करून कंट्रोल सेंटर ओपन करा.
 • एरोप्लॅन आयकॉन टॅप करून एअरप्लेन मोड अ‍ॅक्टिव्हेट करा.
 • त्यामुळे तुमचं वायफाय, ब्लूटूथ आणि फोनचा सिग्नल तात्पुरता बंद होईल आणि आपोआप तुमचा DNS cache डेटा क्लियर होईल. ही प्रोसेस जेव्हा कराल तेव्हा तुमचा DNS cache डेटा आपोआप डिलीट होईल.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने