तुम्हाला डार्क चॉकलेट खायला आवडते? पण ते आरोग्यासाठी चांगले आहे की वाईट? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात….

चॉकलेट ही अशी गोष्ट आहे; जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडते. हल्ली डार्क चॉकलेटनेसुद्धा सर्वांनाच वेड लावले आहे. डार्क चॉकलेटची चव काही लोकांना कडू वाटते; तर काही लोकांना ही चव खूप आवडते. पण डार्क चॉकलेट आपल्या आरोग्यासाठी कितपत चांगले आहे, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? द इंडियन एक्स्प्रेसने मुंबई येथील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलच्या आहारतज्ज्ञ भक्ती सामंत यांच्या हवाल्याने या संदर्भात माहिती दिली आहे.

डार्क चॉकलेट कमी प्रमाणात खाल्ल्याने आपल्या आरोग्यावर खूप चांगला परिणाम होतो. डार्क चॉकलेटमध्ये असलेल्या अँटिऑक्सिडंट्स घटकांमुळे हृदय व रक्तवाहिन्यांवर सकारात्मक परिणाम होत असला तरी डार्क चॉकलेट खाणे चांगले आहे का, हे समजून घेणे गरजेचे आहे. त्यामुळे डार्क चॉकलेट आरोग्यासाठी चांगले आहे की वाईट, हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून समजून घेणे आवश्यक आहे.
डार्क चॉकलेटचे फायदे

डॉर्क चॉकलेटमध्ये फ्लेव्होनॉइड्स असतात; जो एक प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स आहेत. फ्लेवोनॉइड्स पेशींना सुरक्षित ठेवण्यास मदत करतात. हे अँटिऑक्सिडंट्स दीर्घकालीन आजारांचा धोका कमी करतात आणि आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करतात.

अनेक अभ्यासांमधून असे समोर आले आहे की, डार्क चॉकलेटचे सेवन हे हृदयाच्या आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरते. जर कमी प्रमाणात डार्क चॉकलेटचे सेवन केले, तर रक्तदाब नियंत्रित ठेवणे, रक्तप्रवाह सुरळीत ठेवणे व हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी करणे यांसाठी मदत होते.

डार्क चॉकलेटमधील फ्लेव्होनॉइड्स मेंदूच्या आरोग्यासाठीही चांगले आहे. त्यामुळे मेंदूपर्यंत जाणारा रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते. त्याशिवाय तुमचा मूडसुद्धा सुधारण्यास डार्क चॉकलेट एक चांगला पर्याय आहे.

डार्क चॉकलेटमधील अँटीऑक्सिडंट्स त्वचेला सुरक्षित ठेवण्यास आणि संपूर्ण आरोग्य सुदृढ ठेवण्यास मदत करतात. कमी प्रमाणात डार्क चॉकलेटचे सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी आणि चमकदार त्वचेसाठी अधिक फायदेशीर आहे.

डार्क चॉकलेटचे तोटे

डार्क चॉकलेटमध्ये भरपूर कॅलरीज असतात. त्यात असलेल्या साखर आणि फॅट्समुळे वजन वाढू शकते; ज्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.

जेव्हा डार्क चॉकलेट तु्म्ही कमी प्रमाणात खाता, तेव्हा तो संतुलित आहाराचा भाग बनतो.

डार्क चॉकलेटमधील अँटीऑक्सिडट्ंस हृदय आणि मेंदूच्या आरोग्यासाठी चांगले असतात; पण डार्क चॉकलेटमध्ये असणाऱ्या कॅलरीज, साखर व फॅट्स यांच्या प्रमाणाविषयी जागरूक असणे, आवश्यक आहे.

डार्क चॉकलेटचे अतिसेवन केल्यामुळे वजन वाढू शकते; ज्यामुळे डार्क चॉकलेट आरोग्यासाठी फायदेशीर ठरणे कमी होते.

त्याशिवाय अॅलर्जी किंवा विशिष्ट औषधी घेत असलेल्या व्यक्तींनी डॉर्क चॉकलेटचे सेवन करताना काळजी घेणे आवश्यक आहे.

डार्क चॉकलेटचा आरोग्यावर होणारा परिणाम खूप लहान स्वरूपाचा आहे. हे चॉकलेट आरोग्यासाठी खूप फायदेशीर नाही किंवा खूप वाईट नाही. कमी प्रमाणात या चॉकलेटचे सेवन केल्याने तुमच्या आरोग्यावर याचा फायदा दिसून येईल आणि तुम्हाला या चॉकलेटच्या चवीचासुद्धा आनंद घेता येईल.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने