थायलंड-श्रीलंकेनंतर आता मलेशियामध्ये व्हिसा फ्री एंट्री; एक डिसेंबरपासून मिळणार सुविधा

दुसऱ्या देशात फिरायला आवडणाऱ्या लोकांसाठी आंनदाची बातमी समोर आली आहे. आता मलेशियाने देखील भारतीयांना 30 दिवसांचा फ्री ट्रॅव्हल व्हिसा देणार असल्याचे जाहीर केले आहे. म्हणजे आता भारतीयांना 30 दिवसांपर्यंत मलेशियामध्ये फिरण्यासाठी व्हिजाची आवश्यकता नसणार आहे.

मलेशियाचे प्रधाननमंत्री अन्वर इब्राहिम यांनी सांकगितेले की चीनच्या नागरिकांप्रमाणेच भारतीयांना देखील हा नियम लागू असेल. त्यामुळे श्रीलंका आणि थायलँडनंतर मलेशिया तीसारा आशियाई देश आहे ज्याने भारतीय नागरिकांना व्हिसा फ्री ट्रॅव्हलची सुविधा दिली आहे. यापूर्वी मलेशियाने साऊदी अरब, बगरीन, कुवेत, यूएई, इराण, तुर्की आणि जॉर्डन या देशांना देखील ही सुविधा दिली आहे.
मलेशियाचे पंतप्रधान म्हणाले की भारतीय आणि चीनी नागरिकांना व्हिसा मध्ये सवलत सेक्युरिटी क्लिअरन्सनंतरच दिली जाईल. ज्या लोकांचे क्रिमीनल रेकॉर्ड असेल त्यांना व्हिसा फ्री एंट्री दिली जाणारक नाही. ते म्हणाले की गृहमंत्री सैफुद्दीन इस्माइल व्हिजा फ्री एंट्री आणि सवलतीबद्दल डिटेल्स जारी करतील. चीनने देखील मलेशियासाठी व्हिसा फ्री पॉलिसी जाहीर केली आहे. 1 डिसेंबर 2023 ते 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत लादू राहिल.

मलेशियानेही भारतासोबतच्या संबंधांबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. मलेशियाचे पंतप्रधान म्हणाले की, प्रत्येक आघाडीवर भारताचे सहकार्य आवश्यक आहे. आसियान-इंडिया मीडिया एक्स्चेंज कार्यक्रमादरम्यान मलेशियातील भारताचे उच्चायुक्त बीएन रेड्डी म्हणाले की, मलेशियाशी संबंध खूप मजबूत आहेत. दोन्ही देशांनी सकारात्मक दिशेने वाटचाल करण्याची गरज आहे. दोन्ही देशांच्या राजकीय संबंधांना 65 वर्षे पूर्ण झाली आहेत. 2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मलेशिया दौऱ्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ झाले आहेत.

2022 मध्ये मलेशिया भारताचा 11वा सर्वात मोठा व्यापारी भागीदार होता. 2021 च्या तुलनेत 2022 मध्ये दोन्ही देशांमधील व्यापार 23 टक्क्यांनी वाढला आहे. भारत आणि चीनच्या नागरिकांना 1 डिसेंबरपासून मलेशियात फ्री एंट्री मिळणार आहे. आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी आणि पर्यटन वाढविण्यासाठी मलेशिया हे पाऊल उचलत आहे. यादरम्यान व्हिएतनाम देखील भारतातील लोकांसाठी व्हिसामुक्त प्रवेशाची घोषणा करू शकते, असे सांगण्यात येत आहे. सध्या जर्मनी, फ्रान्स, इटली, स्पेन, डेन्मार्क, स्वीडन आणि फिनलँडसाठी ही घोषणा करण्यात आली आहे.

या देशात भारतीयांना व्हिसा फ्री एंट्री

मलेशिया, थायलंड, श्रीलंका, कुक आयलंड, हैती, जमैका, मॉन्टसेरात, किट्स अँड नेव्हिस, फिजी, मायक्रोनेशिया, नियू, भूतान, वनुआटू, ओमान, कतार, त्रिनिदाद, कझाकस्तान, मकाओ, नेपाळ, बार्बाडोस, ब्रिटिश व्हर्जिन आयलंड, डोमिनिका, ग्रेनेडाइन, एल साल्वाडोर, ट्युनीशिया आणि सेनेगल.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने