उपाशीपोटी चावाल ५ हिरवी पानं, तर नसांमधील चिकटलेले घाणरडे कोलेस्ट्रॉल फेकेल शरीर बाहेर

कोलेस्ट्रॉल नसांमध्ये जमा होऊ लागल्यावर अनेक आजार शरीराला चिकटतात आणि मग हाय कोलेस्ट्रॉल हे नसांमध्ये ब्लॉकेज निर्माण होण्याचे कारण ठरते. Bad Cholesterol हे हृदयातील नसा ब्लॉक करून हृदयविकारासाठी अथवा स्ट्रोक येण्याचा धोका अधिक असतो. हाय कोलेस्ट्रॉलची समस्या दूर करण्यसााठी अनेक औषधांचा आधार घेत असाल तर तुम्ही काही घरगुती उपाय करून पाहा.

कोलेस्ट्रॉल नियंत्रणात आणण्यासाठी काही झाडांची पाने अत्यंत उपयुक्त ठरतात. तुम्ही या पानांचे चर्वण करून कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात आणू शकता. तसंच अनेक आजारांपासूनही दूर राहू शकता. याची अधिक माहिती आम्ही तुम्हाला या लेखातून देत आहोत.
कडिपत्ता

कोलेस्ट्रॉलसाठी कडिपत्त्याची पाने अत्यंत उपयुक्त ठरतात. कडिपत्त्यामध्ये असणारे अँटीऑक्सिडंट्स गुण खराब कोलेस्ट्रॉल कमी करतात. उपाशीपोटी कडिपत्त्याची पाने चावलेल्या हाय कोलेस्ट्रॉल लवकर खाली येण्यास मदत मिळते. रोज तुम्ही साधारण ८-१० कडिपत्त्याची पाने चावली तर तुमच्या शरीराला याचा नक्कीच फायदा मिळतो.

मेथी दाणे आणि पाने

अभ्यासात सांगण्यात आले आहे की, मेथीचे पूरक आहार रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत करू शकतात. 2020 च्या विश्लेषणानुसार, संशोधकांना आढळले की मधुमेह असलेल्या लोकांमध्ये कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यात मदत करण्यासाठी मेथीच्या पूरक आहाराच्या वापरास पुरावे समर्थन देतात.

जांभूळाची पाने ठरतात गुणकारी

जांभूळ खाल्ल्याने डायबिटीस नियंत्रणात राहतो हे तर सर्वांनाच माहीत आहे. मात्र जांभळाची पानं चावून खाल्ल्याने नसांमध्ये जमा झालेले घाणेरडे कोलेस्ट्रॉल तुम्ही शरीराबाहेर फेकू शकता. जांभळाची पानं कोलेस्ट्रॉल कमी करून हृदयाच्या आजारांपासूनही तुम्हाला दूर ठेवण्यास मदत करतात.

कोलेस्ट्रॉलसाठी तुळशीची पाने

तुळशीची पाने आरोग्यदायी असतात हे आपल्याला सर्वांना माहीत आहे. तुळशीची पाने रोज सकाळी चावल्याने तुमच्या शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल LDL बाहेर फेकण्यास मदत मिळते. तुळशीची पानांमुळे प्रतिकारशक्ती वाढते आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यास फायदा मिळतो. त्यामुळे किमान आठवड्यातून ३ वेळा तरी ही पाने चावून खावीत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने