अक्षय कुमारनं घेतला मोठा निर्णय,यापुढील काळात कोणत्याही प्रकारे...! बॉलीवूडच्या खिलाडीनं काय म्हटलंय?

बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार हा नेहमीच त्याच्या वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असणारा सेलिब्रेटी आहे. त्याचा चाहतावर्गही मोठा आहे. आता त्यानं एक मोठा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्या त्या निर्णयाचे चाहत्यांनी स्वागत केले असून नेटकऱ्यांनी त्याची दखल घेतली आहे.

त्याचे झाले असे की, २०२२ मध्ये अक्षय कुमार, शाहरुख खान आणि अजय देवगण हे तीनही सेलिब्रेटी एकाच जाहिरातीमध्ये दिसले होते. ती जाहिरात पानमसाल्याची होती. त्यावरुन त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल देखील करण्यात आले होते. त्यांच्यावर टीकाही झाली होती. सोशल मीडियावर खूप सारे मीम्सही व्हायरल झाले होते. यानंतर अक्षयनं माफी मागत एक पोस्ट शेयर केली होती.
यापुढील काळात आपण कोणत्याही प्रकारे तंबाखू आणि तंबाखूजन्य उत्पादनांची जाहिरात करणार नाही असे अक्षयनं म्हटले होते. त्यानंतर त्या जाहिरांतीमधून मिळालेली रक्कम ही समाजपयोगी कामांसाठी खर्च करणार असेही तो म्हणाला होता. आता अक्षयचा संबंधित कंपन्यांसोबतचा करार संपुष्टात आला आहे.

अक्षय आता विमल इलायचीच्या जाहिरातीमध्ये दिसणार नाही. अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. जनसत्तानं याबाबत अधिक माहिती देणारे वृत्त दिले आहे. संबंधित कंपनीबरोबर अक्षयनं त्याचा करार रद्द केला आहे. त्यामुळे यापुढील काळात त्या जाहिरातीमध्ये शाहरुख खान आणि अजय देवगण हे दोन्ही सेलिब्रेटी दिसणार आहेत.

अक्षय कुमारच्या आगामी प्रोजेक्टविषयी....

अक्षयच्या वर्कफ्रंटविषयी बोलायचे झाल्यास तो आगामी काळात हाऊसफुल ५ मध्ये दिसणार आहे. तो चित्रपट ६ जुलै २०२५ मध्ये प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून चाहत्यांना त्याच्या या चित्रपटाची मोठ्या प्रमाणात उत्सुकता आहे. साजिद नाडियावालानं याबाबत एक स्टेटमेंट जाहिर केले होते त्यात त्यानं हाऊसफुल ५ विषयी माहिती दिली होती.

याशिवाय अक्की हा टायगर श्रॉफ सोबत बडे मिया छोटे मिया मध्ये दिसणार आहे. तसेच सिंघम ३ मध्ये देखील त्याची वर्णी लागली आहे. त्यात त्याची भूमिका सुर्यवंशीची आहे. अक्षयचा शेवटचा चित्रपट मिशन रानीगंज होता. तो बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नाही. त्यानंतर तो आता ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. ओटीटीवर त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने